शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव वगळता ‘वंचित’ची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:33 IST

मनसेच्या सर्व ६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, मतविभागणीचा फायदा

जळगाव : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ११ मतदारसंघांपैकी मनसेने ६ मतदारसंघात तर वंचित बहुजन आघाडीने ९ मतदार संघांमध्ये उमेदवार दिले होते. मात्र वंचितच्या चाळीसगाव मतदार संघातील उमेदवाराने दिलेली लढत वगळता उर्वरीत सर्व मतदारसंघांमध्ये वंचित व मनसेचा बार फुसका ठरला आहे. मनसेच्या सर्व तर वंचितच्या ८ उमेदवारांचे डिपॉझीटही जप्त झाले आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेने युती केली. तर काँग्रेस-राष्टÑवादीने आघाडी केली होती. मनसेने व वंचित बहुजन आघाडीने मात्र स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यातही या दोन्ही पक्षांचे उमेदवार स्वतंत्रपणे लढले. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. मनसे व वंचित बहुजन आघाडीमुळे मतांची विभागणी होईल व त्याचा फटका युती व आघाडीला बसेल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र वंचितच्या चाळीसगावच्या उमेदवाराचा अपवाद वगळता अन्य उमेदवारांनी हे अंदाज फोल ठरविले.मनसेच्या पदरी अपयशमनसेने जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, जामनेर, अमळनेर, चाळीसगाव या ६ मतदार संघांमध्येच उमेदवार दिले होते. परंतु सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. एकाही उमेदवाराला २ टक्के देखील मते मिळालेली नाहीत. सर्वाधिक १.९१ टक्के मते जळगाव शहर मतदार संघातील उमेदवाराला मिळाली आहेत.वंचितला चाळीसगाव वगळता अपयशवंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी जळगाव शहर, भुसावळ, जामनेर, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, मुक्ताईनगर, एरंडोल, रावेर या ९ मतदारसंघांमध्येच उमेदवार दिले होते. मात्र चाळीसगावमधील उमेदवार मोरसिंग राठोड यांचा अपवाद वगळता एकही उमेदवार चांगली लढत देऊ शकला नाही.चाळीसगावला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने ३८हजार ४२९ मते म्हणजेच १७.६३ टक्के मते घेतली. त्यामुळे राष्टÑवादीच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. मात्र अन्य ८ मतदार संघांमधील त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव