शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातून गायब झालेली मुलगी सापडली चार तासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 22:43 IST

जामनेर येथून पहाटे चार वाजता घरातून गायब झालेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अवघ्या चार तासातच शोधून काढले. नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली मुलगी पहाटे चार वाजता घरातून कोणालाच काहीही न सांगता निघून गेली. आई, वडील सकाळी सात वाजता झोपेतून उठले असता मुलगी जागेवर नसल्याचे पाहून त्यांचे भानच हरपले. 

ठळक मुद्दे जामनेर शहरातून गायब झाली मोबाईल लोकेशनमुळे सापडली मुलगी अपहरणाच्या गुन्ह्याऐवजी केली हरविल्याची नोंद

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २७ : जामनेर येथून पहाटे चार वाजता घरातून गायब झालेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अवघ्या चार तासातच शोधून काढले. नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली मुलगी पहाटे चार वाजता घरातून कोणालाच काहीही न सांगता निघून गेली. आई, वडील सकाळी सात वाजता झोपेतून उठले असता मुलगी जागेवर नसल्याचे पाहून त्यांचे भानच हरपले. दरम्यान, सर्वत्र शोधाशोध करुनही कुठेच मिळून येत नसल्याने पालकांची चिंता अधिकच वाढली. सर्वत्र नातेवाईक व शेजारील नागरिक घरी जमल्याने पालकांना रडू कोसळले होते. मुलगी सापडत नसल्याने मोठ्या संख्येने नागरिक जामनेर पोलीस ठाण्यात धडकले. लोकांचा दबाव व गर्दी पाहता पोलीस निरीक्षक नजीर शेख यांनी या प्रकरणात हरविल्याची नोंद घेतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या संपर्क साधून तांत्रिक माहितीच्या आधारावर काही माहिती मिळते का म्हणून प्रयत्न केला. कुराडे यांनी विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांना तातडीने मुलीच्या बाबतीत माहिती काढण्याच्या सूचना केल्या. जशी माहिती मिळत गेली तशी ती हेडकॉन्स्टेबल रमेश कुमावत यांच्यापर्यंत पोहचविण्यात येत होती. दोन्ही यंत्रणांमध्ये योग्य समन्वयदोन्ही यंत्रणामध्ये योग्य समन्वय झाल्याने चार तासातच मुलगी गावाशेजारी शेतात अभ्यास करताना आढळून आली. दरम्यान, अल्पवयीन मुले-मुली हरविल्या असतील तर थेट अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, मात्र या प्रकरणात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा न दाखल करता हरविल्याची नोंद घेतली.