शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनायोद्धा नामांकनात दुजाभाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 17:59 IST

आरोग्य सेवकांचा समावेशच नाही, अन्याय झाल्याने संताप व्यक्त

हरताळा, ता. मुक्ताईनगर :  कोरोनायोद्धा म्हणून गौरव करण्यासाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, तंत्रज्ञ यांचा समावेश केला आहे, मात्र यातून आरोग्य सेवक, कक्ष सेवक, सहायक सेवक यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य सेवक व कक्ष सेवक यांनी संताप व्यक्त करीत आम्ही कोरोनायोद्धे नाही काय, असा सवालही उपस्थित केला आहे.     काम करूनही उपेक्षितचगेल्या २२ मार्चपासून आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोनाविरोधात स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता रात्रंदिवस सेवा देत आहेत. यात अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, तर काहीचा जीवही गेला. अशा परिस्थितीत कार्य करताना तसेच सर्वांचा सक्रिय सहभाग असताना असा दुजाभाव का? उत्कृष्ट कोरोना वाॅरियर्स नामांकन यादीतून आरोग्य सेवक आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, औषधनिर्माण अधिकारी, स्वच्छतादूत यांना का? वगळण्यात आले, असा प्रश्न उपस्थितीत करत आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.याबाबत  मुक्ताईनगर  तालुका आरोग्य अधिकारी निलेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.  निवेदनावर आरोग्य सेवक व्ही. एम. पाटील, व्ही. एस. चौधरी, व्ही. एस. पाटील , आर. आर. ठोंबरे, एम. के. तारू, एस. एन. येशी, एस. डी. विसपुते, जे. आर. मिसर, ए. बी. हिरोळे,  ए. आर. जाधव, ए. आर. गंगातीरे, आर .आर. सुरवाडे, आर .व्ही. कोळी, ए. टी.बारी, एम.डी. चौधरी, आर.आर. वाघ, व्ही. आय. मोरे,  एस. जी. पाटील, पी. आर. पवार, पी. एस. मोरे, ए. व्ही. गटमणे, ए. सी. ठाकरे आदी आरोग्य सेवक व आरोग्य सहायक यांच्या सह्या आहेत. या सर्वांनी निवेदन सादर केले.तीन महिन्यांपासून पगार नसल्याने हालतीन महिन्यांपासून पगार नसल्याने आरोग्य सेवकांची यंदाची संक्रांत ही कडूच गेली. २४ तास सेवा देत आरोग्य कर्मचारी आपल्या मुलाबाळांची तमा न बाळगता कोरोना रुग्णांना सेवा देत आहे. मात्र तीन महिन्यांपासून पगार नसल्याने यंदाची संक्रांत ही कडूच झाली असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. हक्काची व मेहनतीची कमाई त्वरित देण्यात यावी, अशी अपेक्षा या सेवकांनी केली आहे. काम करून जर कष्टाचे दाम भेटत नसेल तर काय फायदा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे .