उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सूत्रसंचालन विधानसभा क्षेत्रप्रमुख जे.के. पाटील यांनी केले. समाजकल्याण विभागाचे अधिकारी भरत चौधरी यांनी या शिबिराबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी शिवसेना संपर्कप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख डाॅ. विलास पाटील, शहरप्रमुख योगेश गंजे, सभापती डाॅ. अर्चना पाटील, नूतन उपसभापती रावण भिल्ल, सदस्य रामकृष्ण पाटील, युवा सेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, अल्पसंख्याक सेलचे इम्रानअली सय्यद, शिवसेना उपतालुकाप्रमुख रतन परदेशी, डाॅ. विशाल पाटील, संजय पाटील, विजय पाटील, रवींद्र पाटील, नीलेश पाटील, नागेश वाघ उपस्थित होते.
या शिबिरात शहरासह तालुक्यातील २५० नागरिकांसह महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी झालेल्या अपंग व दिव्यांग व्यक्तींना सायकलींसह वस्तू आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार आहेत. या शिबिरात जिल्हा समाजकल्याण विभागाचे अधिकारी भरत चौधरी, जिल्हा रुग्णालयाचे डाॅ. अर्मात वाघदे, जयपूर फुट तज्ज्ञ मुंबई शेरसिंग राठोड व त्यांची संपूर्ण टीम, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अधिकारी एस.पी. गणेशकर, सायक्लोलाॅजिस्ट सुवर्णा चव्हाण आदींनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली.