शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

संचालक आमदाराचे दूध संघासमोरच धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:56 IST

जळगाव, नशिराबादेत रास्ता रोको

जळगाव : दुध उत्पादकांच्या दुधाला हमीभाव द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी भाजपतर्फे गरिबांना दूध वाटप करून शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे आपण संचालक असलेल्या दूध संघासमोरच आमदार सुरेश भोळे यांनी आंदोलन केले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दूध उत्पादकांच्या दुधाला भाव नाही, कोरोना काळात दुधाला उठाव नाही, हॉटेल्स रेस्टॉरंट, खानावळी, मिठाईची दुकाने व थंडपेय, आईस्क्रिम, लस्सी, चहा कॉफीची दुकाने सर्व काही गेल्या ४ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. दुधाला दहा रुपये भाववाढ मिळावी व दूध पावडरला पन्नास रुपये अनुदान मिळावे, या मागण्यांसाठी भाजपतर्फे शनिवारी आंदोलन करण्यात आले.जळगावात दुध फेडरेशनसमोर व संपूर्ण परिसरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली व व गरीब गरजूंना दूध वाटप करून धरणे आंदोलन केले.याप्रसंगी महापौर भारती सोनवणे, भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर दीपक सूर्यवंशी, अ‍ॅड. शुचिता हाडा, भगत बालाणी, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, राजेंद्र मराठे, प्रा. भगतसिंग निकम, प्रवीण जाधव, उज्ज्वला बेंडाळे, ललित चिरमाडे, सुभाष सोनवणे, जितेंद्र मराठे, कैलास सोनवणे, नाना कोळी, रमेश आहुजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.नशिराबादलाही आंदोलननशिराबाद येथेही दूध दराविरोधात आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, चंदूलाल पटेल, उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. नशिराबाद महामार्गावर दुधाची गाडी अडवून त्यातील दूध संकलित करण्यात आले. या अडीचशे लिटर दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, माजी सभापती प्रभाकर सोनवणे, कमलाकर रोटे, अरुण सपकाळे, संतोष नारखेडे, योगेश पाटील, माजी सरपंच प्रदीप बोढरे, मनोहर पाटील, हर्षल चौधरी, मिलिंद चौधरी, सचिन पवार, जितेंद्र महाजन, राजू पाचपांडे, ललित बराटे, मोहन येवले, पप्पू रोटे, सुदाम धोबी, सुनील लाड, भाऊसाहेब पाटील, सचिन महाजन, डॉ. नजरूल इस्लाम, दर्शन जोशी आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

टॅग्स :Jalgaonजळगाव