शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

मुक्ताईनगर तालुक्यात डिजिटल शाळा चालतात ‘उसनवारी’च्या विजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 16:38 IST

विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी खासगी शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळाही डिजिटल करण्यात येत आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या मुक्ताईनगर तालुक्यातील १०८ पैकी ६१ शाळांना आजच्या स्थितीत वीजच नसल्याचे चित्र आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेजारी राहणाऱ्यांकडून वीजपुरवठा घेऊन या शाळांचे कामकाज चालविले जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे१०८ पैकी ६१ शाळांना वीजच नाही, थकबाकीने वीज खंडित ६१ शाळांकडे साडेतीन लाख रुपये विजेची थकबाकीअशा वेळेस शेजारपाजारकडून तात्पुरता वीजपुरवठा

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी खासगी शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळाही डिजिटल करण्यात येत आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या मुक्ताईनगर तालुक्यातील १०८ पैकी ६१ शाळांना आजच्या स्थितीत वीजच नसल्याचे चित्र आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेजारी राहणाऱ्यांकडून वीजपुरवठा घेऊन या शाळांचे कामकाज चालविले जात असल्याचे चित्र आहे.लोकवर्गणी आणि समग्र शिक्षा अभियानाच्या निधीसह गाव पातळीवर ग्रामपंचायतींकडून चौदाव्या वित्त आयोगातून सढळ हाताने मदत मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या १०८ पैकी ८२ शाळांना ‘डिजिटल’ची जोड मिळाली असून, उर्वरित २६ शाळा लवकरच डिजिटल करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने सोडला आहे.शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात अध्ययन, अनुभव प्रदान करता यावे म्हणून जि.प. शाळांना डिजिटलची जोड दिली जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्ययन करणाºया विद्यार्थ्यांना दप्तरमुक्त शिक्षणासाठी बहुतांश शाळांनी पुढाकार घेतला. या माध्यमातून हसत-खेळत शिक्षणप्रणालीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गळती आणि शिक्षणाप्रती आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आनंददायी शिक्षण कसे घेता येईल, यासाठी डिजीटल शाळा करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पुरेशा निधीअभावी प्रत्येक शाळेच्या वर्गखोल्या डिजिटल करणे शक्य नसल्याने लोकवर्गणीवर भर देण्यात आला आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १०८ प्राथमिक शाळा आहेत. शिक्षक, पालक व गावकºयांची लोकवर्गणी आणि समग्र शिक्षा अभियानांतर्गतच्या निधीसह अलीकडे चौदाव्या वित्त आयोगातून अनेक ग्रामपंचायतीने पुढाकार घेत गावाच्या शिक्षणाला डीजीटलची जोड देण्यास पुढाकार घेतल्याने १०८ पैकी ८२ शाळा डिजिटल करण्यात आल्या. यात बहुसंख्य शाळांमध्ये एकापेक्षा जास्त डिजिटल वर्गखोली उभारण्यात आली आहे, तर ८ ते ९ शाळांमध्ये प्रत्येकी चार वर्ग डिजिटल करण्यात आले आहेशाळा डिजिटल आणि वीज गुलतालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल करण्याच्या उपक्रमांत शिक्षण विभागाने आघाडी घेतली. कौतुकास पात्र आहे. परंतु डिजिटल झालेल्या शाळांमध्ये वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. तालुक्यातील सर्व जि.प. शाळांपैकी आज ६१ शाळांमध्ये वीजपुरवठा नाही. वीज बिल थकबाकीपोटी येथील वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या धोरणानुसार जि.प. शाळेलादेखील व्यावसायिक वीज दर आकारण्यात येते. त्यामुळे विजेचा वापर नसतानाही अव्वाच्या सव्वा वीज बिले येतात. परिणामी वर्षाला सात हजार रुपये सादिल मिळणारी जिल्हा परिषद शाळा मोठमोठ्या आकड्यात आलेले वीज बिल भरणार तरी कसे, हा प्रश्न येतो. ज्या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समित्या मजबूत आहेत तेथील लोक वर्गणीतून वीज बिल भरून टाकतात. परंतु ज्या ठिकाणी वीज बिल भरले जात नाही तेथे अडचणी येतात. अशा वेळेस डिजिटल उपक्रमास शेजारपाजारकडून तात्पुरता वीजपुरवठा मिळून डिजिटल वर्ग चालवण्याचा आनंद उपभोगला जात आहे.आज रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील १०८ शाळांपैकी ६१ शाळांकडे तीन लाख ४० हजार १६० रुपये वीजबिल थकीत आहे. एकीकडे जि.प.शाळांमध्ये शहरी शाळांप्रमाणे डिजिटल शिक्षणाची कास धरली जात आहे. त्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. हे टिकवून ठेवण्यासाठी शाळांना अखंडित वीजपुरवठा मिळवून देण्याची जबाबदारी शासनाने किंवा जिल्हा परिषदेने स्वीकारल्यास खºया अर्थाने ग्रामीण भागात जि.प.शाळेत डिजिटल शिक्षण दिले जाईल 

टॅग्स :Educationशिक्षणMuktainagarमुक्ताईनगर