शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकतेचा संदेश : दिगंबर मुनींचे जैन श्वेतांबर मंदिरात प्रवचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 11:55 IST

जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या इतिहासात पहिलाच योग

जळगाव : महावीर जयंतीनिमित्त शहरात आलेले जैन धर्मियांचे मुनी प.पू. १०८ आचार्य श्री विशुद्धसागरजी महाराज यांचे परम् प्रभावी शिष्य प.पू. १०८ अस्तिक्यसागरजी महाराज व १०८ प्रणीतसागरजी महाराज यांचे मंगळवारी संध्याकाळी श्री वासूपूज्य जैन मंदिरात प्रवचन झाले. १०० वर्षे जुन्या असलेल्या या मंदिरात प्रथमच दिगंबर जैन मुनींचे प्रवचन झाल्याने जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघात हा इतिहास घडला आहे. जैन धर्मात विविध संप्रदाय असले तरी या प्रवचनाने समाजबांधवांनी एकतेचा संदेश दिला.गेल्या आठवड्यात या दिगंबर जैन मुनींचे शहरात आगमन झाले असून शिवाजीनगरातील श्री शांतीनाथ दिगंबर जैन (लाल) मंदिर येथे विराजमान आहे. मंगळवारी त्यांना जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्यावीने निमंत्रित करण्यात आले होते.शहरातील श्री वासूपूज्य जैन मंदिर हे १०० वर्षे जुने असून जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्यावीने येथे विविध कार्यक्रम होत असतात. या ठिकाणी श्वेतांबर मुनींचे आगमन होण्यासह त्यांचे प्रवचन होते. मात्र इतिहासात प्रथमच या ठिकाणी जैन मुनींचे आगमन होऊन त्यांचे प्रवचन झाले.भगवान श्री वासूपूज्य जैन मंदिरात मुनीश्रींचे आगमन झाल्यानंतर तेथे त्यांनी भगवंतांचे दर्शन घेतले व संघ प्रमुख भागचंद बेदमुथा, दिलीप गांधी, प्रदीप मुथा, महेंद्र रामसिना, राजेश जैन यांनी स्वागत केले.अपेक्षा ठेवू नका..या वेळी मुनीश्रींनी आपल्या प्रवचनात सांगितले की, कोणाचेही दोष दाखविण्यापेक्षा ते झाका. द्रव्य हिंसा आणि भाव हिंसा अशा दोन्ही प्रकारच्या हिंसेपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. जीवनात जास्त अपेक्षा ठेवल्या तर समस्या वाढतात, त्यासाठी विना अपेक्षा जीवन जगल्यास ते सुकर होते.या वेळी रमेश संघवी, नीरज कामथानी, प्रदीप जैन, जितेंद्र गांधी, सुमती टाटिया यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर बाझल यांनी मंगलाचरण सादर केले तर सूत्रसंचालन दिलीप गांधी यांनी केले.यशस्वीतेसाठी धर्मनाथ नवयुवक मंडळाने परिश्रम घेतले.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरJalgaonजळगाव