नेरी, ता.जामनेर : जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेरी दिगर उपबाजारातील धान्य मोजमापच्या तोलकाटय़ात तफावत आढळल्याने शेतक:यांनी संताप व्यक्त केला आहे. काटय़ात धान्याचे वजन कमी दाखवून बाजार समितीचे कर्मचारी व व्यापारी शेतक:यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.शेतक:यांच्या घरात पडून असलेला माल व्यापारी कवडीमोल भावात घेऊन आर्थिक कोंडी करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कवडीमोल भावात घेतलेल्या मालाच्या वजनात मापात पाप करून शेतक:यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप होत आहे. येथील जुने हिंगणे रस्त्याने असलेल्या कापूस उत्पादक संस्थेच्या आवारात उपबाजाराचा तोलकाटा आहे. या तोलकाटय़ावर दोन दिवसांपूर्वी माळपिंप्री येथील शेतकरी रमेश नामदेव पाटील यांनी आपल्या शेतातील मका विक्रीसाठी आणला असता तोलकाटय़ावर दाखविलेले वजन व प्रत्यक्ष असलेल्या वजनामध्ये तब्बल सहा क्विंटलचा फरक आढळला. यावरून रमेश पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला असता काटय़ावरील कर्मचा:याने शेतक:याचा संताप पाहून वजनाच्या पावतीवर खाडाखोड करून हाताने नवीन वजन लिहून दिले व आपला पराक्रम सावरण्याचा प्रय} केला, असा आरोप आहे. घडलेला या प्रकाराची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू असून, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात व्यापारी व मापारी संगनमताने शेतक:यांची लूट करत असून, बाजार समिती प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शेतक:यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बाजार समिती व व्यापारी शेतक:यांची फसवणूक करीत असून या शेतक:यांनी जागरूक राहण्याची गरज आहे. 5 ते 10 किलोचा फरक आपण समजू शकतो. मात्र तब्बल सहा क्विंटल वजनाचा फरक म्हणजे यात संबंधितांची मिलीभगत उघडपणे दिसून येत आहे. याबाबत आपण तक्रार केली असून, बाजार समिती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.-रमेश पाटील, अन्यायग्रस्त शेतकरी, माळपिंप्रीतोलकाटय़ाच्या तांत्रिक कारणाने हा प्रकार घडलेला असून, यात कुणाचाही दोष नाही. संबंधित काटय़ाची दुरुस्ती केली असून, यापुढे असले प्रकार घडणार नाही. -तुकाराम निकम, सभापती, बाजार समिती, जामनेर
तोलकाटय़ात तफावत
By admin | Updated: May 30, 2017 00:53 IST