शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुलीवंदनलाही लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST

केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य द्या जळगाव : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या ...

केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य द्या

जळगाव : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगरच्या वतीने करण्यात आली. याविषयी अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

पथदिवे बंद

जळगाव : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर शहरातील विविध भागातील पथदिवे बंद असून ते अजूनही सुरू झालेले नाही. यात प्रभात चौक ते मू.जे. महाविद्यालय व पुढे गिरणा टाकी थेट वाघ नगर पर्यंत पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वाहनधारकांची कसरत

जळगाव : शहरातील रस्त्यांची दुरवस्था होण्यासह आता अनेक भागात रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या कचऱ्यामुळे वाहनधारकांची कसरत होत आहे. त्यात शनिवारी खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली असताना बाजारपेठेतून बाहेर पडताना वाहनधारकांना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचर्‍यावरून वाहने द्यावे लागली.

शासकीय योजनांची माहिती घेण्यास अडथळा आणणाऱ्या कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी

जळगाव : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात शासकीय शिधापत्रिका तसेच आत्मनिर्भर भारत योजनेविषयी माहिती घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटू न देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

याविषयी पक्षाचे जळगाव शहर युवा अध्यक्ष नीलेश बोरा यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, बोरा व अनिल सोनवणे हे दोघेजण २६ मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात अधिका-यांना भेटण्यासाठी गेले असता तेथील महिला कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी हे कार्यालयात असतानाही त्यांना भेटू दिले नाही. उर्मटपणे बोलून अपमानास्पद वागणूक दिल्याचे पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे या महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.