शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याच्या झेड.बी. पाटील महाविद्यालयाने जिंकली जकातदार स्मृतीकरंडक विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 19:13 IST

भडगाव येथील रजनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मधुकर सदाशिव जकातदार व वत्सलाबाई मधुकर जकातदार स्मृतीकरंडक विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. ‘जातीनिहाय आरक्षण ही समाजाची गरज आहे.’ या ज्वलंत विषयावरील या स्पर्धेचे विजेतेपद व फिरता चषक धुळे येथील झेड.बी.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या चमूने पटकावला.

ठळक मुद्देभडगाव महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा‘जातीनिहाय आरक्षण ही समाजाची गरज आहे.’ या ज्वलंत विषयावर स्पर्धकांनी मांडली परखड मते

भडगाव, जि.जळगाव : येथील रजनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मधुकर सदाशिव जकातदार व वत्सलाबाई मधुकर जकातदार स्मृतीकरंडक विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. ‘जातीनिहाय आरक्षण ही समाजाची गरज आहे.’ या ज्वलंत विषयावरील या स्पर्धेचे विजेतेपद व फिरता चषक धुळे येथील झेड.बी.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या चमूने पटकावला.सामाजिक कार्यकर्ते व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक विनय मधुकर जकातदार यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपयाचे बक्षीस धुळे येथील झेड.बी.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रसाद देवीदास जगताप याने जिंकले, तर याच महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर गोपाळराव शितोळे याने दोन हजार रुपयांचे तृतीय बक्षीस मिळवले.भुसावळ येथील पी.ओ.नाहटा महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंजली संग्राम पाटील हिने तीन हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. बी.पी.आर्ट्स महाविद्यालय, चाळीसगाव येथील सागर हनुमंत बोरसे व नहाटा महाविद्यालय, भुसावळ येथील हर्षल संजय भांडारकर यांनी पाचशे रुपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे पटकावली.स्पर्धेचे उद्घाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक बबनराव देशमुख यांच्याहस्ते, संचालक विजयराव देशपांडे व विनय जकातदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.पारितोषिक वितरण समारंभ पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्याहस्ते, भोला चौधरी, विनय जकातदार, विजय देशपांडे व प्राचार्य डॉ.एन.एन.गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला.संस्थेचे संचालक खलील देशमुख, सुनंदा जकातदार व माजी मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. डॉ.बी.एस.भालेराव यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. डॉ.सी.एस.पाटील व प्रा.जी.एस.अहीरराव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डी.ए.मस्की, डॉ.सचिन हडोळतीकर, प्रा.आर.एम.गजभिये, प्रा.श्रावण कोळी, प्रा.जे.जे.देवरे, प्रा.स्वप्नील भोसले, प्राध्यापकांंनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Educationशिक्षणBhadgaon भडगाव