शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात उपचारासाठी दाखल बंद्याने ठोकली धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST

जळगाव : श्वासोच्छ्वासाचे कारण सांगून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल झालेल्या जोसेफ राजू अब्राम्ह याने पोलिसांची नजर चुकवून पलायन केल्याची ...

जळगाव : श्वासोच्छ्वासाचे कारण सांगून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल झालेल्या जोसेफ राजू अब्राम्ह याने पोलिसांची नजर चुकवून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेजारीच ऊसाच्या शेतात लपलेल्या जोसेफ याला पकडण्यात पोलिसांना यश आले. २१ एप्रिल रोजी पहाटे साडे पाच वाजता घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, २० एप्रिल रोजी कैदी जोसेफ अब्राम्ह याला उपचारासाठी जळगाव -भुसावळ रोडवरील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. अब्राम्ह याची कोरोनाची चाचणीही करण्यात आली होती. ती निगेटीव्ह आली होती. मात्र कैद्याला श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यास रुग्णालयातील आपातकालीन विभागात उपचारासाठी दाखल केले होते. याठिकाणी पोलीस मुख्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र रोहिदास पांडव तसेच पोलीस कॉन्स्टेबल विनोद सोनवणे यांची ड्युटी होती. दरम्यान २१ एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कर्मचारी वार्डात गेले असता जोसेफ बेडवर नव्हता. तो पळून गेल्याची खात्री झाल्यावर ही बाब पोलीस मुख्यालय तसेच नशिराबाद पोलिसांना कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यावर नशिराबाद पोलीस ठाण्याच अधिकारी तसेच कर्मचार्‍यांनी रुग्णालय गाठले. पळून गेलेल्या बंद्याचा शोध सुरु केला. पोलिसांच्या ताफ्याने रुग्णालयाच्या परिसरातील शेतांमध्ये त्याचा शोध घेतला. यादरम्यान एका ऊसाच्या शेतात अब्राम्ह हा लपलेला होता. त्यास पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र रोहिदास पांडव यांच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.