शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

दीर-भावजयीचा निर्घृण खून

By admin | Updated: October 13, 2015 23:05 IST

स्नेहनगरात दीर-भावजयीचा अत्यंत निर्घृण खून झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

धुळे : शहरातील स्नेहनगरात तरुण दीर-भावजयीचा अत्यंत निर्घृण खून झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या थरारक घटनेत शस्त्रांनी वार झालेल्या दिराचा मृतदेह साडीने गळफास घेऊन झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला, तर कोयत्याने वार झालेला भावजयीचा मृतदेह झाडाझुडपांमध्ये आढळून आला.

या घटनेतील दिराचे नाव सुरेश उर्फ पप्पू डिगंबर मोरे (वय 24, रा.श्रीरामनगर, दूध डेअरीमागे, धुळे) असे तर भावजयीचे नाव कविता संतोष मोरे (28, रा.अरुणकुमार वैद्यनगर, साक्री रोड, धुळे) असे आहे. याप्रकरणी मयत कविताचे पती संतोष डिगंबर मोरे यांच्या फिर्यादीवरून रात्री शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सुरेशचा मृतदेह दिसला अन्..

स्नेहनगरातील खांडलविप्र भवनाच्या मागे सोमवारी मध्यरात्री झाडाला एका तरुणाचा मृतदेह साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

शहर पोलिसांनी पंचनाम्यानंतर सुरेशचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्या गळ्यावर, हातांवर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी आजूबाजूला पाहणी केली असता झाडाझुडपांमध्ये महिलेचा मृतदेह आढळला.

4हा मृतदेह मयत सुरेशची भावजयी कविता हिचा होता. मृतदेहाच्या बाजूलाच धारदार कोयता व दगड मिळून आला. कविताच्या डाव्या कानाच्या बाजूस कोयत्याने वार करण्यात आले आहेत.