शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्य़ातील गुडय़ा खून प्रकरणी इंदूरमधून दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 12:46 IST

सीसीटीव्हीची मदत घेवून धुळे जिल्हा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली़

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात धुळ्यात 8 ते 9 पथकांची नियुक्ती इंदूर बायपास येथे दोन संशयित असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 29 - रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्डय़ा याच्या खून प्रकरणानंतर तपास कामाला धुळे पोलिसांनी गती दिलेली आह़े शनिवारी सकाळी या प्रकरणातील संशयित राजा उर्फ भद्रा देवरे आणि विलास उर्फ छोटा पापा गोयर यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या़ पोलीस बंदोबस्तात त्यांना धुळ्यात आणण्यात आल़े मंगळवार 18 जुलै रोजी सकाळी गुडय़ाचा खून झाल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला़ सीसीटीव्हीची मदत घेवून धुळे जिल्हा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली़ त्यासाठी 8 ते 9 पथकांची नियुक्ती करण्यात आली. टप्प्याटप्प्याने या घटनेतील मुख्य संशयित आरोपी आणि त्यांना मदत करणा:यांना पकडण्याचे काम सध्या या विशेष पथकांद्वारे जोमाने सुरु आह़े याप्रकरणातील मुख्य संशयित 7 आणि त्यांना मदत करणारे 6 संशयिताना पकडण्यात आले आह़े शनिवारी सकाळी मध्यप्रदेश राज्यातील इंदूर बायपास येथे दोन संशयित असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार सापळा रचण्यात आला़ मोठय़ा शिताफिने राजा उर्फ भद्रा देवरे आणि छोटापापा उर्फ विलास श्याम गोयर यांना ताब्यात घेण्यात आल़े भद्रा याला देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या पथकाने तर छोटापापा याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांच्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले आह़े पुढील तपास सुरु आह़े