आॅनलाईन लोकमतजामनेर,दि.२९ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी धनराज चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने शुक्रवारी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कृषी बाजार समितीचे सभापती तुकाराम निकम यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावरील निवडीसाठी शुक्रवारी संचालकांची बैठक आयोजित केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.आर.पाटील व साहाय्यक निबंधक एम.आर.शहा उपस्थित होते. सभापतीपदासाठी एकमेव अर्ज आल्याने चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.चव्हाण यांची निवड जाहीर होताच समर्थकांनी त्यांची सवाद्य मिरवणूक काढली. भाजपा कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी माजी सभापती तुकाराम निकम, उपसभापती दीपक चव्हाण, रामकिसन नाईक, गोपाल नाईक, गोविंद अग्रवाल, यशवंत पाटील, राजू चौधरी, राजेश पाटील यांच्यासह संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी धनराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 18:28 IST
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नवनियुक्त सभापतींचा सत्कार
जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी धनराज चव्हाण
ठळक मुद्देतुकाराम निकम यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्तपदासाठी निवडणूकधनराज चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवडसभापतीपदी नियुक्तीनंतर काढण्यात आली सवाद्य मिरवणूक