शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे ‘ढोल जागर’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 19:50 IST

आरक्षणाच्या मागणीचे निवेदन सादर : चाळीसगाव, पाचोरा व भुसावळात समाज बांधव एकवटले

चाळीसगाव/पाचोरा/भुसावळ, जि.जळगाव : धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा व भुसावळ येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले.धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमाती मध्ये करण्यात यावा ही मागणी गेल्या ६५ वषार्पासून प्रलंबित आहे. याच मागणीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजता चाळीसगाव येथे तहसील कार्यालयासमोर धनगर बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणू सोडला. ‘ढोल जागर’ आंदोलन करुन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, 'धनगड' जमात काही राज्यांमध्ये अनुसूचित जमातीत आहे. धनगड, धनगर एकच असून ६५ वर्षापासून अन्याय होत आहे. विद्यमान सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याचे मान्य केले होते. मात्र सत्तेत येऊन चार वर्ष होऊनदेखील त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. यामुळे समाजाला न्याय मिळत नाही. २१ सप्टेंबर रोजी पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही सरकारला जाग न आल्यास राज्यव्यापी धनगर आरक्षण एल्गार महामेळाव्याचे आयोजन करुन उग्र आंदोलन करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला. आंदोलनात पोपट आगोणे, विठ्ठल शिंगाडे, रमेश जानराव, बापू सोनवणे, अ‍ॅड. प्रमोद आगोणे, विलास रावते, अ‍ॅड. रवींद्र लांडगे, प्रकाश थोरात, शैलेंद्र सातपुते, धर्मा काळे, शिवराम गढरी, ज्ञानेश्वर वाघमोडे, गणेश जाने, बापू आगोणे, स्वप्नील मेटकर, सागर आगोणे, दत्तात्रय चव्हाण, राहुल बच्छे, विश्वास पाडोळे, दगा शिंदे, विशाल आगोणे सहभागी झाले होते.‘धनगड आणि धनगर’ एकच समाजमहसूल प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इतर राज्यांमध्ये धनगड जमात अनुसूचित जमातीत आहे. त्यामुळे गेल्या ६५ वर्षांपासून धनगर समाजावर अन्याय होत आहे. सरकार झोपेचे सांग घेऊन बसले आहे. न्याय न मिळाल्यास २१ सप्टेंबर रोजी पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे.यानंतर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला आहे.असेच आंदोलन पाचोरा व भुसावळ येथेही करण्यात आले. संबंधित स्थानिक प्रशासनाला समाजातर्फे निवेदने देण्यात आली.

टॅग्स :agitationआंदोलनAmalnerअमळनेर