शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

देवा तुचि गणेशु...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:35 IST

आज गणेश चतुर्थी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी). प्रत्येकवर्षी हा उत्सव साधारणत: १०-११ दिवस साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ...

आज गणेश चतुर्थी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी). प्रत्येकवर्षी हा उत्सव साधारणत: १०-११ दिवस साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या उत्सवाची सांगता असते, अशी मान्यता आहे की, भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. भगवान गणेश म्हणजे ज्ञान, समृद्धी व उत्तम दैव यांचे प्रतिक आहे. आज श्री गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते, त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. आरती झाल्यावर मोदकांचा प्रसाद दिला जातो. लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून साजरा केला जातो.वैदीक परंपरेनुसार किंवा अध्यात्म शास्त्रांच्या मान्यतेनुसार प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्व आहे. या तत्वानुसार श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. महाराष्टÑातील सर्व संतानी श्री गणेशाचे वर्णन केलेले आहे. ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकाचा मायबाप, कैवल्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी श्री गणेशाचे वर्णन केले आहे.देवा तुंचि गणेशु । सकलार्थमति प्रकाशु ।।म्हणे निवृत्तीदासु । अवधारिजो जी । ज्ञानेश्वरी।।श्री निवृत्तीदासांचे दास, श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे आत्मरूपा परमेश्वर ! माझ्या बोलण्याकडे लक्ष दे ! वैदीक वाङमयातील संपूर्ण अर्थाच्या ज्ञानाचा प्रकाश किंवा स्फुरण स्वरूप असा जो गणेश तो तुच आहेस. वैदीक वाङमयात ज्ञानदात्री देवता गणेश समजली जाते. सर्व देवतांच्या ठिकाणी जो काही शक्तीचा उद्बोध दिसून येतो, तो सर्व माझ्याच शक्तीचा उद्बोध आहे असे भगवतांनीच गीतेत सांगितले आहे.वैदिक परंपरेत भगवान गणेशांचे विशेष स्थान आहे. कोणत्याही प्रकारची पूजा, हवन किंवा मंगलकार्याची सुरूवात गणेशाची स्तुतीशिवाय अपूर्ण असते.गणेश वंदनाशिवाय कोणत्याही कार्याला सुरूवात होत नाही. हा उत्सव पूर्ण भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगात भारतीय साजरा करतात. त्यातल्या त्यात महाराष्टÑ व मध्यप्रदेशात याची मजा काही औरच असते. या उत्सवाचे फक्त धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्व नाही तर राष्टÑीय एकामत्मतेचे प्रतीक आहे. या उत्सवाची सुरूवात आजपासून सुरू झालेली आहे. या उत्सवाचा सांस्कृतिक व राष्टÑीय एकात्मतेसाठीच उगम झालेला आहे आणि त्याचं पावित्र टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावयास पाहिजे. श्री गणेशाची पूजा किंवा उत्सव साजरा करणे ही साधना आहे. याचा विसर होऊ नये आणि श्री गणेशांनी आम्हाला यासाठी शक्ती द्यावी ही प्रार्थना..!-डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम, ता.धरणगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव