शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप विरोधकांना हवा ३०० कोटी निधीचा तपशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 19:49 IST

जामनेर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे सोशल मीडियावर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपाचे विरोधक असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनादरम्यान शाब्दिक सामना रंगत आहे. शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये आणल्याच्या दाव्यावर विरोधकांकडून तपशील मागितला जात आहे.

ठळक मुद्देसोशल मिडीयातून सुरू झाले आहेत आरोप- प्रत्यारोपभाजपसमर्थकांकडूनही जोरदार प्रत्युत्तरविकास कामांच्या गुणवत्तेबाबत खोचक सवाल

लोकमत आॅनलाईनजामनेर, दि.१६ :नगरपालिका निवडणूक जवळ येत असतांनाच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत असून भाजप विरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना असा शाब्दीक सामना रंगत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विकासासाठी आणलेल्या ३०० कोटीच्या निधीचा तपशील मागून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचे दिसत आहे.सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व तरुण सध्या फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून त्यांच्यात होऊ घातलेल्या जामनेर नगरपालिका निवडणुकीचीच चर्चा रंगत आहे.पालिकेकडून मंजुर झालेल्या कामांच्या भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण कार्यक्रम होत आहेत. शहराच्या विकासासाठी शासनाकडून ३०० कोटी रुपये खेचून आणल्याचा दावा मंत्री महाजन करीत आहे. नेमकी याच विषयाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.असे आहेत आक्षेपविकासासाठी मिळालेल्या ३०० कोटीबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तपशीलाची मागणी करीत आहे. त्याच बरोबर काँग्रेस आघाडीच्या काळातील नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी मिळविलेल्या निधीतूनच कामे होत असल्याचा त्यांचा दावा आहे. होत असलेल्या कामाची गुणवत्ता संशयास्पद असल्याची ओरड देखील केली जात असून कामे करीत असलेल्या ठेकेदारांवर मोठ्या प्रमाणात आरोप केले जात आहेत. रस्ते खोदणे, बुजविणे व जलवाहिनीसाठी किंवा भूमिगत गटारीसाठी वारंवार पुन्हा तेच करणे यालाच विकास म्हणतात काय? असा खोचक सवाल विरोधक विचारीत आहे. 

टॅग्स :JamnerजामनेरSocial Mediaसोशल मीडिया