शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

कोरोनाविरुद्धच्या लढाईत बलिदान देणाऱ्या महान आत्मांचे भरले ‘डेरगं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 21:21 IST

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाचे बलिदान देणाºया महान आत्म्यांचे अक्षय तृतीयेच्या दिवशी डेरगं भरून आदरांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देपारोळा तालुक्यातील शिक्षकाचा उपक्रमसुखशांतीसाठी केली प्रार्थना

रावसाहेब भोसलेपारोळा, जि.जळगाव : कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाचे बलिदान देणाºया महान आत्म्यांचे अक्षय तृतीयेच्या दिवशी डेरगं भरून आदरांजली वाहण्यात आली. पारोळा तालुक्यातील शिक्षकाने हा उपक्रम राबविला.अक्षय तृतीयेचा उर्फ आखाजी हा सण खान्देशात विशेष करून मोठ्या प्रमाणात आनंद व उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी परिवारातील मृत व्यक्तीच्या आत्मशांती व मोक्ष प्राप्तीसाठी मातीची नवीन घागर भरली जाते. लोटा व पंचामृतसाठी छोटी बोळकी घरी आणून पूजा करून परिवारातील सदस्य व जवळचे भाऊबंद त्यात पवित्र जल टाकून त्या आत्माच्या शांतीसाठी प्रार्थना करतात. नंतर घरात त्या दिवशी केलेले अन्नपदार्थ, पंचामृत, शुद्ध तुप हे प्रज्वलित अग्नीत अर्पण करून तर्पण करतात. त्यास आगारी किंवा घास टाकणे म्हणतात. तसेच हयात व्यक्तीला आयुष्य, आरोग्य व धन मिळावे यासाठीही प्रार्थना केली जाते.आपण हा विधी आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तीसाठी तर करतोच पण जि. प. प्राथमिक शाळा धाबे, ता.पारोळा येथील मुख्याध्यापक मनवंत साळुंखे व त्यांच्या पत्नी चित्रा पाटील यांनी संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणुकीनुसार ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत कोरोना या महाभयंकर आजाराशी लढताना लाखो लोकांचे जीव वाचविण्यासाठी काही महान डॉक्टर, परिचारिका, पोलीस व सफाई कर्मचारी यांनी जीवाचे बलिदान दिले. तसेच अनेक निरपराध नागरिक कोरोना आजाराचे बळी ठरले. खान्देशातील धार्मिक परंपरेनुसार या दाम्प्याने मृत आत्मांची शांती व मोक्षप्राप्तीसाठी डेरगं भरून त्यांना आदरांजली वाहिली. तसेच पवित्र अग्नीत त्यांचे स्मरण करून आगारीही टाकली.याप्रसंगी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पुना पाटील व युवा सामाजिक कार्यकर्ता प्रदीप जगन्नाथ पाटील यांनीही या धार्मिकप्रसंगी उपस्थित राहून पवित्र जलअर्पण करून पूजन केले. घास टाकला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParolaपारोळा