शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू पसरवतोय हातपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:35 IST

दररोज १० ते १२ डेंग्यू सदृश्य रुग्ण

जळगाव : शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दररोज एकेका रुग्णालयात १० ते १२ डेंग्यू सदृष्य रुग्ण येत आहेत. डेंग्यूच्या रक्ततपासणीचीही संख्या वाढत असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे शहरात डेंग्यूच्या औषधीचाही तुटवडा भासत आहे.वातावरणात बदल होऊन अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याच्या तक्रारी वाढून अनेकांना पोटदुखी व जुलाबचा त्रास वाढला. त्यानंतर गेल्या १० ते १२ दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.सध्या दररोज दोन ते तीन रुग्ण डेंग्यूचे येत असल्याची माहिती मिळाली. तीन ते चार दिवसांपासून थंडी-तापचा त्रास होऊन रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रक्त तपासणीमध्ये डेंग्यू असल्याचे निदान होत आहे.या मुळे रुग्णांच्या कुंटुंबासह परिसरातही भीतीचे वातावरण पसरत आहे. या सोबतच एकेका खाजगी रुग्णालयात दोन ते तीन डेंग्यूचे रुग्ण दाखल असल्याची माहिती मिळाली.शहरातील खोटे नगर, मेहरुण परिसर, वाघ नगर, रुख्मीनी नगर, समता नगर या भागातदेखील डेंग्यू सदृष्य आजाराची लक्षणे असल्याचे सांगितले जात आहे. या भागात ताप येणे, डोके दुखणे, मळमळणे अशी लक्षणे असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. हे नागरिक खाजगी रुग्णालयात धाव घेत असून उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.रक्त तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढलीरुग्णालयात येणाºया रुग्णांपैकी किमान १० ते १२ रुग्णांमध्ये डेंग्यूचे लक्षणे आढळून येत असून त्यांना डेंग्यू सदृष्य आजार असल्याचे निष्पन्न होत आहे. रुग्णालयात येणाºया रुग्ण रक्त तपासणीही करीत असून ही संख्या आठ ते दहा दिवसांपासून वाढली असल्याचे सांगितले जात आहे. डेंग्यूचे दररोज किमान २ ते ३ रुग्ण आढळत आहे.औषधींचा तुटवडाडेंग्यूचे रुग्ण वाढत असताना उपाययोजना होणे गरजेचे आहे. असे असले तरी जे रुग्ण आहे, त्यांच्यासाठी शहरात डेंग्यूच्या औषधींचा तुटवडा भासत असल्याची माहितीही मिळाली.डेंग्यू सदृष्य आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ आहे. गेल्या १० ते १२ दिवसात असे रुग्ण वाढले आहेत. डेंग्यूचे निदान होणाºया रुग्णही काही प्रमाणात आहे. -डॉ. राजेश पाटील, बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :Jalgaonजळगाव