शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथे ग्रामस्थांचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:30 IST

पाझर तलाव क्रमांक ३, नदीजोडचा पोहोच कालवा आदी अपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या मागण्यांवरुन साखळी उपोषणास बसलेल्या जुवार्डी ग्रामस्थांचा आता मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचा नाही, असा दुसºया दिवशीही निर्धार कायम होता. ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाबरोबरच १० जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी निर्धार ठाम भूसंपादन निधी वनविभागाकडे वर्ग कराअपूर्ण कामास प्रशासकीय मान्यता द्या

खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : पाझर तलाव क्रमांक ३, नदीजोडचा पोहोच कालवा आदी अपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या मागण्यांवरुन साखळी उपोषणास बसलेल्या जुवार्डी ग्रामस्थांचा आता मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचा नाही, असा दुसºया दिवशीही निर्धार कायम होता. ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाबरोबरच १० जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

पाझर तलावाच्या कामात १३ हेक्टर वनविभागाच्या बाधीत जमिनीचा भूसंपादन निधी ८१ लाख ३८ हजार प्रत्यक्ष वनविभागाकडे वर्ग केल्याशिवाय व आडळसे-जुवार्डी-पथराड नदीजोडचा पोहोच कालवा, बहाळ-जुवार्डी कालवा आदी अपूर्ण सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता-निधी यावर ठोस निर्णय झाल्यासच उपोषण मागे घेण्यावर ग्रामस्थ ठाम आहे.काशिनाथ पाटील, रमेश पाटील, हेमराज पाटील, रवींद्र्र पाटील, तात्या पाटील, जगन पाटील, सखाराम पाटील, विजय साळुंखे, प्रकाश पाटील व रवींद्र चिंधू पाटील आदी १० ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले आहेत.मंगळवारी उपोषणस्थळी तहसीलदार वाघ यांनी ग्रामस्थांना जळगाव येथे जावून चर्चा करण्याची विनंती केली. ती ग्रामस्थांनी धुडकावली. पं.स.चे सभापती रामकृष्ण पाटील, पाचोरा कृउबाचे अ‍ॅड.विश्वास भोसले, डॉ.उत्तमराव महाजन, अमोल शिंदे, संजय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विलास पाटील, जिल्हा दूध संघाचे प्रमोद पाटील, जे.के.पाटील यांनी, तर बुधवारी माजी आमदार दिलीप वाघ, तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदीप पवार, जि.प.चे माजी सभापती विकास पाटील, बापूराव पाटील आदींनी उपोषणस्थळी ग्रामस्थांशी चर्चा केली.दरम्यान, विद्यमान आमदार-खासदार यांनी अद्याप उपोषणाची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.उपोषणासंर्दभात जिल्हाधिकाºयांनी दि.२० रोजी विभागीय आयुक्त नाशिक यांना तातडीने पत्र देत वनविभागाला द्यावयाच्या भूसंपादन निधीबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव