जळगाव : मेहरूण तलावाच्या संवर्धनासाठी व सुशोभिकरणासाठी जलसंपदा विभागाकडून विशेष निधी प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी भाजपाचा नगरसेविका अॅड.शुचिता हाडा यांनी महापौरांकडे केली आहे. अॅड. हाडा यांनी दिलेला प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे. अॅड.हाडा यांनी मेहरूण तलाव ज्या विभागाच्या अंतर्गत येतो, त्या जलसंपदा विभागाकडून विशेष निधी मिळविण्यासाठी स्वत: व्यक्तीश: पुढाकार घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच मनपाकडूनही त्यासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे.
मेहरूण तलाव संवर्धनासाठी जलसंपदा निधीची मागणी
By admin | Updated: September 23, 2015 00:07 IST