रेल्वे स्टेशन परिसरात अस्वच्छता
जळगाव : रेल्वे स्टेशनवर परिसरातील माल गोडावून परिसरात गटारीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
पथदिवे बसविण्याची मागणी
जळगाव : रेल्वे स्टेशनकडून जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने तातडीने पथदिवे बसविण्याची मागणी नागरीकां मधून केली जात आहे.
पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी
जळगाव : शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दर दिवसाआड दुचाकी चोरीला जात आहेत. तरी पोलीस प्रशासनाने गस्त वाढविण्याची मागणी नागरिकां मधून केली जात आहे.