शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:17 IST

वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी जळगाव : आकाशवाणी चौकात सायंकाळी वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहने सुसाट जात आहेत. तसेच ...

वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी

जळगाव : आकाशवाणी चौकात सायंकाळी वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहने सुसाट जात आहेत. तसेच सिग्नल यंत्रणाही बंद असल्यामुळे महामार्गावरील वाहनधारकही न थांबता वाहने वेगाने चालवित आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक विभागाने या चौकात वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

अनियमित साफसफाईअभावी आरोग्य धोक्यात

जळगाव : नवीपेठेत अनियमित वेळेवर साफसफाई होत नसल्यामुळे गल्लीबोळात कचऱ्यांचे ढीग पसरले आहेत. यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने या भागात साफसफाई मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

हुतात्मा एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी

जळगाव : कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हुतात्मा एक्सप्रेस बंद असल्यामुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना रात्रीच्यावेळी पुण्याला जाण्यासाठी सोयीची असल्यामुळे, या गाडीला सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत आहे. मात्र, आता कोरोनामुळे ही गाडी बंद असल्यामुळे प्र‌वाशांना जादा पैसे मोजून पुण्याला जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

स्टेशनसमोरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी

जळगाव : रेल्वेस्टेशनसमोर सायंकाळी विविध खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या लागत असल्यामुळे, रस्त्यावर वाहतूक कोंडी उद्भवत आहे. यामुळे प्रवाशांना पायी चालणेही अवघड झाले आहे. तरी मनपा प्रशासनाने येथील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी प्र‌वाशांमधून केली जात आहे.