शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मागणी घटलेल्या खोबऱ्याला ‘सोनपावले’ पावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:32 IST

गौरी-गणपतीसाठी ५० टन खोबºयाचा प्रसाद

जळगाव : पावसाळी वातावरणामुळे मागणी घटलेल्या खोबºयाला गौरी-गणपती उत्सवामुळे पुन्हा मागणी वाढली असून या उत्सव काळात खोबºयाची दुप्पट विक्री झाली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीपासून दर महिन्याला केवळ २० ते २५ टन विक्री होणाºया खोबºयाची गौरी-गणपती काळातील विक्री ५० टनावर पोहचली आहे.मसाल्यामध्ये वापर होणाºया खोबºयाला तशी वर्षभर मागणी असते. त्यामुळे जळगावातील खड्या मसाल्यासोबतच खोबºयाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. मात्र पावसाळ््याच्या सुरुवातीपासून खोबºयाची मागणी घटते. या दिवसात ओलाव्यामुळे खोबºयाला बुरशी येऊन ते खराब होते, त्यामुळे आवश्यक तेवढ्याच मालाची खरेदी ग्राहक करीत असतो. सोबतच विक्रेतेही मालाचा साठा कमी ठेवतात.त्यानुसार यंदाही ही मागणी पावसाळ््याच्या सुरुवातीपासून कमी झाली होती. त्यात गेल्या वर्षीचे जादा भाव पाहता यंदा भाव कमी होणाच्या आशेने मागणी आणखी घटली. ज्या ठिकाणी ५० गोणी खोबरे व्यापारी घेत होते ते आता केवळ १० गोणीच खोबरे खरेदी करीत होते.उत्सवाचे वेध लागताच मागणी वाढलीपावसाळी वातावरण असले तरी या दिवसात येणाºया गौरी-गणपती उत्सवासाठी खोबºयाला मागणी वाढली. या उत्सवासाठी विक्रेत्यांनी वाढीव मागणी करीत खोबºयाचा आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवला. केरळमधील बडागरा येथून सर्वात जास्त खोबºयाची आवक जळगावात होते. त्या सोबतच कोचीन भागातूनही खोबरे येते. नेहमीप्रमाणे ही आवक सुरू असताना पावसाळ््याच्या सुरुवातीपासून ती कमी झाली. दर महिन्याला केवळ २० ते २५ टन खोबरे जळगावात येऊ लागले. मात्र गणपतीसाठी ‘खिरापत’ अर्थात खोबरे, साखर, सुकामेवा यांच्यापासून तयार होणाºया प्रसादासाठी खोबºयाची आवश्यकता असतेच, सोबतच गौरींच्या स्थापनेत खोबऱ्यांच्या वाट्यांचा वापर होतो तसेच ओटी भरण्यासाठीही खोबरे लागतेच. त्यामुळे या सणांच्या काळात मागणी दुप्पटवर पोहचून या उत्सवासाठी ५ ट्रक खोबºयाची विक्री झाली.आवक चांगलीगेल्या वर्षी केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खोबºयाची आवक घटून भावही वाढले होते. मात्र यंदा केरळात पावसाचा फटका न बसल्याने खोबºयाची आवक चांगली होऊन भावही कमी झाले आहे. त्यामुळे भक्तांनाही दिलासा मिळाला आहे.पावसाळी वातावरणामुळे खोबºयाची मागणी घटली. या दिवसात खोबरे टिकत नाही त्यामुळे खोबरे कमीच प्रमाणात मागविले जाते. गौरी-गणेशोत्सवासाठी मागणी चांगली आहे व भावही नियंत्रणात आहेत.- सुरेश बरडिया, सुकामेवा-मसाले विक्रेतेगौरी-गणपती उत्सवासाठी खोबºयाला मागणी वाढून ती दुप्पट झाली. या काळात जवळपास ५० टन खोबºयाची विक्री झाल्याचा अंदाज आहे.- अशोक धूत, खोबरे व्यापारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव