शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यासाठी १५०० वाढीव शिवभोजन थाळींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:36 IST

जिल्ह्यात दररोज ३८ केंद्रांवरून ३५०० थाळ््यांचे वितरण

जळगाव : लॉकडाऊनच्या काळात अनेक गरीब आणि गरजूंना शिवभोजनाचा आधार मिळत असून जिल्ह्यात वाढता प्रतिसाद पाहता जिल्ह्यासाठी आणखी वाढीव एक हजार ५०० शिवभोजन थाळींची मागणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून दररोज ३५०० थाळींचे वितरण होत आहे.थाळीची किंमत निम्म्यावरज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये तर ही योजना जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि निराश्रित यांच्यासाठी वरदान ठरत आहे. त्यात या काळात अनेकांच्या हाताला काम नसल्याने शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपये केली आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे.दिवसेंदिवस वाढती मागणीगेल्या पाच ते सहा महिन्यांपासून या योजनेला जिल्ह्यात वाढता प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला जळगाव शहरातील ९ केंद्र्रासह व मुक्ताईनगर तालुक्यातील एका केंद्रावर जवळपास ९२५ थाळी रोज नागरिकांना वाटप केल्या जात होत्या. त्यानंतर त्यात वाढ होत जाऊन अन्य तालुक्यांमध्येदेखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे सध्या जळगाव शहरातील १६ केंद्रांसह जिल्ह्यातील ३८ शिवभोजन केंद्रांवरून दररोज ३५०० थाळ््यांचे वितरण केले जात आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली.मागणी आणखी वाढविलीया योजनेला वाढता प्रतिसाद पाहता आता पुन्हा वाढीव १५०० थाळ््यांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. तसे पत्र देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात ३८ शिवभोजन केंद्र्राच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यात ४ लाख ९२ हजार ३४८ नागरिकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला.पार्सल स्वरुपात वाटपकोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असल्याने शिवभोजन थाळीचे स्वरूप बदलून पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये पार्सल स्वरूपात तयार जेवण दिले जात आहे. या शिवभोजन थाळीचा वितरण करताना फोटो काढण्यात येतो. प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र अ‍ॅपवरदेखील अपलोड केले जात आहे. एक वाटी वरण, एक वाटी भात, दोन पोळ््या आणि एक वाटी भाजी असे शिवभोजन योजनेचे स्वरूप आहे.दोन केंद्र चालकांना ताकीदशिवभोजन केंद्रांवरून वितरण होणाºया या पार्सल स्वरुपातील थाळीमध्ये देण्यात येणाºया पोळ््या व भाताचे ठरवून दिलेल्या वजनापेक्षा कमी वजन भरल्याचे आढळून आले होते. यामध्ये संबंधितांना ताकीद देण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव