शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

देहिनोऽस्मिन्यथा देहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 21:30 IST

भगवंत स्वत:चा विस्तार असंख्य रुपांमध्ये करतात आणि यापैकी प्रमुख विस्तारित रुपांना विष्णूतत्व म्हटले जाते तर दुय्यम किंवा गौव विस्तारांना ...

भगवंत स्वत:चा विस्तार असंख्य रुपांमध्ये करतात आणि यापैकी प्रमुख विस्तारित रुपांना विष्णूतत्व म्हटले जाते तर दुय्यम किंवा गौव विस्तारांना जीवतत्व म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाले तर, विष्णूतत्व म्हणजे त्यांचे स्वांश तर जीव म्हणजे विभिन्नांश आहेत. भगवंत स्वत:च्या वैयक्तिक विस्ताराव्दारे भगवान राम, नृसिंहदेव, विष्णूमूर्ती आणि वैकुंठलोकातील इतर सर्व अधिष्ठाता मूर्तींच्या रुपात प्रकट होतात.भगवंतांचे स्वांश अर्थात, त्यांची प्रधान रूपे नित्य अस्तित्वात असतात. त्याचप्रमाणे त्याचे विभिन्नांश असणाºया जीवांनाही व्यक्तित्व असते. जीव हे भगवंतांचे अंश असल्याकारणाने त्यांच्यामध्ये भगवंतांचे गुणही अंशरुपाने असतात. स्वातंत्र्य हा एक गुण आहे.या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने जीव बध्द होतो आणि योग्य उपयोग केल्याने तो सदैव मुक्त राहतो. योंपैकी कोणत्याही स्थितीत तो भगवंतांप्रमाणेच गुणात्मकदृष्ट्या सनातन आहे. मुक्तावस्थेमध्ये तो या भौतिक बध्द जीवनातून मुक्त असतो आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न असतो; बध्द जीवनामध्ये त्याच्यावर त्रिगुणांचे वर्चस्व असते आणि त्याला दिव्य प्रेममयी भगवत् सेवेचे विस्मरण झालेले असते.मांजर-कुत्री, मनुष्य-प्राणी इत्यादी जीवच नव्हे तर या प्राकृत जगताचे ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि विष्णू इत्यादी महान नियंत्रकही भगवंतांचे अंश आहेत. ते सर्व अनित्य नसून शाश्वत आहेत. बध्द जीव हा जणू काही लोखंडांच्या साखळ्यांनी बांधला गेला आहे. तो मिथ्या अहंकाराने बांधला गेला आहे आणि मन त्याला संसारात संघर्ष करण्यास भाग पाडण्याच प्रमुख कारण आहे.जेव्हा त्याचे मन सत्वगुणांमध्ये स्थित असते, तेव्हा त्याचे कर्म कष्टप्रद असते आणि तमोगुणांमध्ये असते तेव्हा तो शुध्द जीवयोनीत भ्रमण करत असतो. तरीही या श्लोकावरून स्पष्टच आहे की, बध्द जीवावर, मन व इंद्रियासहित भौतिक शरिराचे आच्छादन आहे आणि जीव मुक्त झाल्यावर हे भौतिक आच्छादन नष्ट होते. परंतु त्याचवेळी त्याचा आध्यात्मिक देह त्याच्या मूळ रुपात व्यक्त होतो. जेव्हा जीव या प्राकृत देहाचा त्याग करून वैकुंठलोकात प्रवेश करतो तेव्हा त्याला त्याचे अध्यात्मिक शरीर प्राप्त होते. आपल्या अध्यात्मिक शरीराव्दारे तो भगवंतांना समोरासमोर पाहू शकतो. ‘स्मृती’वरूनही असे कळून येते की, वैकुंठ लोकांमध्ये जीव हा भगवंतांच्या दिव्य शरीरासारख्याच शरीरामध्ये वास करतो. भगवंतांचे विभिन्नांश असणाºया जीवांमध्ये आणि विष्णूमूर्तींच्य विस्तारांमध्ये मुळीच भेद नसतो. दुसºया शब्दात सांगावयाचे तर भगवतांच्या कृपेमुळे जीवाला मुक्तीनंतर अध्यात्मिक देहाची प्राप्ती होते.- रेवतीरमण दास

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव