शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडेसीम येथे ध्वजाचा अवमान : राष्ट्रीय ध्वज नेला खिशात घालून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 16:44 IST

गुन्हा दाखल

निपाणे, जि. जळगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयावर फडकविण्यात आलेला राष्ट्रीय ध्वज दुपारीच खाली उतरवून खिशात घेवून जाणाऱ्या प्रदिप ओंकार पाटील (रा. हनुमंतखेडेसीम, ता. एरंडोल) या मद्यपी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून ध्वज उतरविला गेला तरी या ठिकाणी कर्मचारी नव्हता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडेसीम येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी १ वाजेच्या सुमारास गावातील रहिवाशी प्रदिप पाटील हा दारुच्या नशेत असताना त्याने ग्रामपंचायतीवरील राष्ट्रीय ध्वज उतरवून खिशात घालून घेऊन गेला.घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अर्चना खेतमाळीस व कासोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षत सुनील पवार यांनी घटनास्थळी जावून चौकशी केलीय या प्रकरणी ग्रामसेवक गुणवंत देसले यांनी कासोदा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून प्रदीप पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप पाटील पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.दरम्यान, ग्रामपंचायतीवर ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर ध्वजाच्या संरक्षणासाठी एकही कर्मचारी नव्हता. या प्रकारास जबाबदार कोण?, याची देखील चौकशी करावी अशीही मागणी केली जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव