शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

रक्षा खडसेंना ५६ तर एकनाथराव खडसे यांना ५१ टक्के पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 13:19 IST

भाजपाच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष

ठळक मुद्देपत्रकार परिषदेत एकनाथराव खडसे यांची माहिती सलग सातव्या वेळी माझ्या आमदारकीला पसंती

मुक्ताईनगर, जि. जळगाव : २०१९ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने खाजगी सर्व्हेक्षणात आमदार-खासदारांची त्यांच्या मतदार संघातील निवडून येण्याची परिस्थिती याबाबत गोपनीय अहवाल नुकताच मुंबई येथील बैठकीप्रसंगी बंद लिफाफ्यात दिला. हा अहवाल उघड करीत यात खासदार रक्षा खडसे यांना खासदारकीसाठी तब्बल ५६ टक्के पसंती असल्याची माहिती माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली. स्वत: खडसे यांना ५१ टक्के पसंती मिळाली आहे.भाजप कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. रावेर लोकसभा मतदार संघाचे खासदार रक्षा खडसे यांच्या खासदार तिकिटावर गदा येणार, अशा बातम्या प्रसार माध्यमातून सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती देतांना त्यानी सांगितले की, या सर्व्हेक्षणात खासदार खडसे यांच्या नावाला खासदारकीसाठी रावेर लोकसभा मतदार संघातून ५६ टक्के पसंती मिळाली आहे नमूद अहवालात ३८ टक्के लोकांनी खासदार रक्षा खडसे यांच्या कामकाजावर संतुष्ट आहेत १६ टक्के लोकांनी समाधानी असल्याचे सांगितले आणि दोन टक्के लोकांनी पुन्हा संधी द्यावी असे सांगितले आहे अशा एकूण ५६टक्के पसंती खासदार रक्षा खडसे यांना मिळाली आहे तर ३५ टक्के लोकांनी बदल पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. उर्वरित नऊ टक्के लोकांनी माहीत नाही असा पर्याय निवडला आहे, असा एकंदरीत अहवाल असल्याचे एकनाथराव खडसे यांनी सांगितलेप्रसंगी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, माजी सभापती विलास धायडे ,स्वीय सहाय्यक योगेश कोलते, माजी सरपंच प्रवीण पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य आसिफ बागवान , नगरसेवक निलेश शिरसाठ, नगरसेवक ललित महाजन आदी उपस्थित होते.खासदार रक्षा खडसे संदर्भातील प्रसारित होणारे वृत्त जनतेची दिशाभूल करणारे आहे त्यांना शंभर पैकी माहीत नसलेला पर्याय वजा केला तर ९१ पैकी तब्बल ५६ टक्के पसंती खासदार रक्षा खडसे यांना असल्याचे तसेच मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघासाठी झालेल्या या सर्व्हेक्षणात तब्बल ५१ टक्के पसंती माझ्या नावाला आहे. सलग सातव्या वेळी माझ्या आमदारकीला पसंती मिळणे ही आपल्या कायार्ची पावती व जनतेचे प्रेम होय, अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगाव