शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तमाशासाठी जमविलेल्या लोकवर्गणीतून पाझर तलावांचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 16:34 IST

चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील गावालगत असलेल्या तिन्ही पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने भर पावसाळ्यात दरवर्षी भरणाऱ्या पाझर तलावात क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा साचत होते. तलाव उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. ग्रामस्थांनी पाझर तलाव खोलीकरणाला लोकसहभागाचे बळ दिले असून, नुकताच खोलीकरणाचा शुभारंभ झाला.

ठळक मुद्देपाणीटंचाई दूर करण्यासाठी लोकसहभागाचे बळदहिवद गावचा विधायक आदर्शतमाशासाठी जमविलेल्या वर्गणीचा वापरमंगेश चव्हाण यांनी उपलब्ध करून दिले पोकलेन

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव .  चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील गावालगत असलेल्या तिन्ही पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने भर पावसाळ्यात दरवर्षी भरणाऱ्या पाझर तलावात क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा साचत होते. तलाव उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. ग्रामस्थांनी पाझर तलाव खोलीकरणाला लोकसहभागाचे बळ दिले असून, नुकताच खोलीकरणाचा शुभारंभ झाला. तमाशासाठी जमा केलेली एक लाख चाळीस हजार रुपयांची लोकवर्गणी या विधायक कामाला देऊन ग्रामस्थांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. युवा उद्योजक मंगेश चव्हाण हेही मदतीला धावून गेले. त्यांनी खोलीकरणासाठी पोकलेन मशीन स्वखचार्ने उपलब्ध करुन दिले आहे.दहिवद गावाची लोकसंख्या आठ हजार आहे. सधन शेतकरी गावकऱ्यांचे गाव म्हणून चाळीसगाव तालुक्यात दहिवद गावाचा वेगळा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आयाम आहे. गावाला लागून तीन मोठे तलाव आहेत. पाझर तलाव दरवर्षी पावसाळयात भरतात. मात्र यामध्ये तलाव निर्मितीपासून गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पाणी साठवण्यासाठी खोली शिल्लक राहिलेली नाही. ही बाब सरपंच सुरेखा पवार, माजी सरपंच भीमराव पवार, उपसरपंच भीमराव खलाणे व सहकाºयांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत गावकºयांशी चर्चा करून या तिन्ही तलावांच्या खोलीकरणासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. यासाठी सर्वांच्या लोकसहभागाची गरज आहे, असा प्रस्ताव मांडला. याप्रसंगी तालुक्यात ज्या ठिकाणी पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशा ठिकाणी उद्योजक मंगेश चव्हाण हे आर्थिक मदत करत असल्याची बाब समोर आली. गावकºयांनी मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन मदत करण्याची विनंती केली. त्यांनीही प्रतिसाद दिला. यासाठी पोकलेन मशीन उपलब्ध करुन दिलेदरवर्षी ग्रामीण भागामध्ये यात्रांप्रसंगी तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही परंपरा आहे. यासाठी गावात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वर्गणी जमा केली जाते. अशाच प्रकारे दहिवद गावात देखील एक लाख ४० हजार रुपये वर्गणी जमा झाली होती. याच वर्गणीतून पोकलेनसाठी लागणारा डिझेलचा खर्च करावा, अशी सूचना भीमराव पवार यांनी मांडली. त्यांच्या सूचनेचे गावकºयांनी स्वागत केले. काहींनी मदतही जाहीर केली.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर वाघ, भीमराव पवार, बळवंत वाघ चिंधा वाघ, एकनाथ पवार, एकनाथ खालाणे, नितीन बागुल, तानाजी जाधव, अनमोल नानकर, उत्तम कोळी, मुरलीधर वाघ, रतन पाटील, गोरख पवार, अनिल सोनवणे, हेमराज पाटील, पिंगळे सुदाम घोडे, बाबाजी मोरे, शिवाजी शितोळे, राजेंद्र पवार आदींसह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईChalisgaonचाळीसगाव