शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

ज्ञानेश्वरी ग्रंथ भावार्थ दीपिका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 21:55 IST

‘श्रीमद्भगवद् गीता सुपनिषत्सु ब्रम्हविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णा अर्जुन संवादे....’ असे १८ अध्यायात १८ प्रकारचे संवाद असून श्रीमद्भगवद् गीता व ज्ञानेश्वरी ...

‘श्रीमद्भगवद् गीता सुपनिषत्सु ब्रम्हविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णा अर्जुन संवादे....’ असे १८ अध्यायात १८ प्रकारचे संवाद असून श्रीमद्भगवद् गीता व ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या प्रत्येक आध्यायाच्या शेवटी आले आहे. ब्रम्हविद्या, उपनिशद, योगशास्त्र तसेच आध्यात्मज्ञान व परमार्थ साधना हे ज्ञानेश्वरीतील मुख्य विषय या भावार्थ दीपिकेचे तत्त्वज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जनसामन्यांसाठी भागवत धर्म, भक्ती संप्रदाय सुरू केला. त्यामुळे एक गुरु व शिष्य ही परंपरा सोडून त्यांनी सर्वांना समजावून ज्ञानदान सर्वांना खुले करुन दिले. ते भावार्थ दीपिका हे ज्ञानेश्वरीचे नाव गीतेचा यथार्थ किंवा गीतेवर भाष्य अथवा टीका अशी पंडिती भूमिका नाही. भावार्थ म्हणजे आशय व्यक्त करणारी ज्योत असा याचा अर्थ होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना मात्र वेगळे सांगावेसे वाटते. भाव भक्ती आहे. ज्यात अशी दीपिका, असे नाव माऊलींनी जाणून बुजुन घेतले असावे. याला भक्तीचा मळा फुलविला आहे. याला संन्यासाचे व ज्ञानाचा दुजाभाव की कर्माचा पुरावा नाही, पण आतून भक्तीच झुळझुळ झरा वाहत असला पाहिजे अशी आस आहे. वारकरी सांप्रदायाच्या भक्ती मार्गाचे अग्रणी श्री ज्ञानेश्वर हे स्वत: ब्रम्हचारी व संन्यासीही. नामदेव हे संसार भक्त, एकनाथ हे कर्म प्रपंचाच समतोल साधणारे गृहस्थ. तुकाराम महाराज भक्तीसाठी संसार सोडून भंडारा डोंगरवर जायचे. त्यांच्यात भक्तीचा उन्मेश जबरदस्त होता. संत पंचकातले ब्रह्मचारी संन्यासाची भक्तीला संतप्त झाले ते या मंडळीमुळेच! जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंते । हा भक्तीयोगू निश्चित जाण माझा ।। १०-११८, हा भावार्थ दीपिकेचा गाभा आहे.श्रोत्यांना माऊली, सर्वज्ञ तर स्वत:ला वाकडे पाऊल टाकणारे बालक समजणे फक्त ज्ञानेश्वरीत सापडेल! अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन स्वयंप्रेरणेचा टेंभा मिरवणाऱ्या आजच्या जनसामान्यातील तथाकथीत विद्वावानांनी ज्ञानरायाची लिनता शिकता आल्यास जरूर शिकावी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिली. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. त्यांनी ज्ञानेश्वरीत हाताळलेले विषय, उपमा व उत्प्रेथा, दृष्टांत यांची केलेली पखरण डोळे दिपवणारी आहे.- हभप गोपाळ महाराज ढाके, भादली बुद्रुक, ता. जळगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव