दीपनगर, ता. भुसावळ : येथील वीज निर्मिती केंद्रातून कमी केलेल्या कंत्राटी कामगरांना कामावर परत घेण्यात यावे या मागणीसाठी सोमवारपासून येथे भाजपतर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्यावर त्यांनी ‘त्या’ कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
येथील वीज निर्मिती केंद्राच्या ५०० मेगाव्हॅट व ६६० मेगाव्हॅट प्रकल्पातून कमलाकर मराठे, तेजस जैन यांच्यासह २५ कंत्राटी कामगारांना मनमानी पद्धतीने २ वर्षांपासून कामावरून कमी करण्यात आले आहे. यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना पुन्हा कामावर घ्यावे या मागणीसाठी तसेच वरणगाव शहरातील तरुणांना स्थानिकांना दीपनगरमध्ये रोजगार द्या, टेंडर प्रक्रियेमध्ये अनियमितता असून याची चौकशी करा या मागणीसाठी भाजपर्फे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह कमलाकर मराठे, तेजस जैन, संदीप महाजन, हर्षल पाटील, उल्हास पाटील, भाजप शहरध्यक्ष सुनील माळी, गोलू राणे, ॲड. ए.जी. जंजाळे, भाजयुमोचे शहराध्यक्ष संदीप भोई, महिला मोर्चा अध्यक्षा प्रणिता पाटील यांच्यासह अनेकांनी उपोषण सुरू केले.
दीपनगर वीजनिर्मिती केंद्राच्या नवीन ६६० प्रकल्पाच्या गेटसमोर सकाळी ९ वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली. दुपारी १२ वाजता खासदार रक्षा खडसे व संजय सावकारे यांनी प्रकल्पाचे प्रभारी मुख्य अभियंता महाजन व मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांच्या सोबत उपोषणस्थळी भेट दिली. परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. यावेळी खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी दीपनगर प्रकल्पातून कमी केलेल्या युवकांना १५ दिवसांच्या आत कामावर घेण्यात यावे अन्यथा दीपनगर खाली करून टाकू, असे स्पष्ट खडेबोल सुनावले. आक्रमकपणे दोन्ही मुख्य अभियंता खंडारे व महाजन यांना खडसावले. यावर दोन्ही मुख्य अभियंता यांनी त्वरित १५ दिवसात कामगारांना कामावर घेतो, असे ठोस आश्वासन आंदोलकांना दिले.
यावेळी सावकारे यांनी कमलाकर मराठे उपोषणकर्त्यंना निंबूपाणी देऊन उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी कामगार नेते मिलिंद मेढे, गजानन वंजारी, योगेश माळी, जावेद शहा, डॉ. सादिक, डॉ. प्रवीण चांदणे, कृष्णा माळी, संदीप माळी, आकाश निमकर, डी. के. खाटीक, संजय बेदरकर, गणेश चौधरी, पप्पू ठाकरे, रॉक कश्यप, शंकर पवार, हितेश चौधरी, महिला आघाडी आध्यक्षा प्रणिता पाटील, राहुल जंजाळे, नरेंद्र बावणे, संजय बेदरकर, जयेश कपाटे, नथ्थू पवार, शंकर पवार, साबीर कुरेशी, आशपाक खाटीक आदी उपस्थित होते.