शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात स्वाइन फ्लू सदृश आजाराने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 12:33 IST

सुप्रीम कॉलनीत शोककळा : ऑक्सिजन रुग्णवाहिका अभावी धुळ्य़ाला हलविता आले नाही

ठळक मुद्देस्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा दावारुग्णालयात गर्दीरुग्णवाहिका मिळालीच नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 16 - शहरातील सुप्रीम कॉलनी भागातील रहिवासी मनिषा विजय चव्हाण (25) या महिलेचा शुक्रवारी सकाळी स्वाईन फ्लू सदृश आजाराने मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. मनिषा चव्हाण या शहरातच राहत असलेले किशोर चव्हाण या त्यांच्या मामाकडे गुरुवारी गेल्या होत्या. तेथे अचानक झटके येऊ लागल्याने किशोर चव्हाण यांनी तिला रामेश्वर कॉलनीतील एका खाजगी दवाखान्यात नेले. तेथून दुसरीकडे नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलविले. तेथेही प्रकृती गंभीर झाल्याने  जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. रात्री 12.50 वाजता जिल्हा रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अखेर शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता मृत्यू झाला. खाजगी रुग्णालयातून या महिलेला हलविण्याचा सल्ला दिल्यानंतर  धुळे अथवा औरंगाबाद येथे न्यायचे होते, मात्र ऑक्सिजन शिवाय या महिलेला नेणे शक्य नसल्याने ऑक्सिजनची सोय असलेली रुग्णवाहिका मिळू शकली नाही व तिला जिल्हा रुग्णालयातच ठेवावे लागले, असे किशोर चव्हाण यांनी सांगितले. मनिषा चव्हाण हिचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात तिच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. या वेळी महिलांना शोक अनावर झाला होता. या बाबत मयत मनिषा चव्हाण यांच्या मामाने सांगितले की, खाजगी रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले असून स्वाइन फ्लू असल्याचा त्यांना संशय आला व त्यांनी दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. मनिषाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे तिच्या मामाचे म्हणणे आहे.अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल - डॉ.पाटीलजिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांना विचारले असता ते म्हणाले,  सदर महिला गरोदर होती व त्या अवस्थेत तिचा रक्तदाब वाढला. स्वाइन फ्लू सदृश आजाराची तिला लागण झाली असावी, यासाठी खाजगी रुग्णालयात घेतलेले रक्ताचे नमुने व तिच्या घशातील थुंकीचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात येतील व त्याचा अहवाल आल्यानंतर स्वाइन फ्लू आहे की नाही, हे स्पष्ट होईल. मात्र स्वाइन फ्लू सदृश रुग्ण आल्यानंतर त्यास टॅमी फ्लू च्या गोळ्य़ा देणे सुरू करतो, असे डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले.