पहूर : जवळच असलेल्या शेरी गावातील शोभा सुपडू भिलखेडे या विवाहितेचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहूर परिसरातील रामचंद्र लोढा यांच्या शेतात मजूर काम करीत असताना विहिरीकडे गेले असता विहिरीत महिलेचे प्रेत आढळून आले.घटनेवर चर्चा झाल्यानंतर महिलेची ओळख पटली. महिला मनोरुग्ण असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. कृष्णा पांढरे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेरीच्या विवाहितेचा विहिरीत पडल्याने मृत्यू
By admin | Updated: May 21, 2014 01:31 IST