शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूदर आणि डॉक्टरांच्या हजेरीवरुन शासकीय वैद्यकीय यंत्रणा धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 11:47 IST

डीन आणि सीएस यांच्यातील बेबनावाचीही चर्चा : मृत्यू रोखण्यासाठी आयएमएचे २५० डॉक्टर

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वाढता मृत्यूदर, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची हजेरी या मुद्द्यांवरून जिल्हा आरोग्य समन्वय समितीची पहिली बैठक गाजली़ अखेर हा मृत्यू दर रोखण्यासाठी आयएमएकडून २५० डॉक्टर सेवा देतील, असा निर्णय जाहीर करण्यात आला़ या बैठकीत डीन आणि सीएस यांच्यातील बेबनाव मिटावा, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत़जिल्हा आरोग्य समन्वय समितीची सभा सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ यावेळी जि़ प़ अध्यक्षा रंजना पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार लता सोनवणे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे, सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील, अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण आदीसह शहरातील काही खासगी डॉक्टर व आयएमएचे पदाधिकारी उपस्थित होते़काही खासगी डॉक्टरांनीही मते व समस्या मांडल्या़ भिलवाडा पॅटर्न यशस्वी ठरला असून तसा काही पॅटर्न आपल्याकडे राबविता येईल का? अशी विचारणा डॉ़ परिक्षित बाविस्कर यांनी केली़ मुकुंद गोसावी यांनी कोरोना रुग्णालय ते डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयापर्यंत वाहन व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी केली़प्रश्नांचा मारा अन् पत्रकारांना बाहेर थांबविले़़़शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कागदावर २०९ डॉक्टर असताना प्रत्यक्षात कर्तव्यावर किती डॉक्टर असतात, असा सवाल खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित केला़ दरम्यान, लोकप्रतिनिधींकडून असे प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना अचानक जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी कॅमेरांमुळे बोलता येत नसल्याचे कारण देत नंतर पालकमंत्री संवाद साधतील असे सांगत पत्रकारांना बाहेर थांबण्यास सांगितले़ अनेक डॉक्टरही बराच वेळ बाहेर थांबून होेते़ स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणीही डॉक्टरांनी या बैठकीत मांडल्या़त्या भुकबळी बाबत चौकशीशहरातील एका तरूणीने उपासमारीला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले असून या प्रकरणात पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहे़ त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर काय ते ठरवू अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना दिली़आयएमएचे डॉक्टर सेवा देणार आहे, मात्र जर शासकीय डॉक्टर अशावेळी सेवा देत नसतील तर हे पाप असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी नमूद केले़ सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले़डीन व सीएस यांनी वाद बाजूला सारावा : पालकमंत्रीअधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांच्यातील मतभेदाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर त्यांनी वाद बाजूला सारून रुग्णांवर लक्ष ठेवणे याच सूचना दिलेल्या असून सर्वांनी मिळून काम करायचे असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले़ वाढता मृत्यू दर रोखण्यासाठी आयएमएची सेवा घेण्यात येणार आहे़ जो शासकीय डॉक्टर कर्तव्यात कसूर करेल त्यावर कारवाई केली जाईल, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले़मृत्यूदर सर्वात जास्त कसा? आमदार किशोर पाटीलजिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्यू दर हा सर्वाधिक आहे़ याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असून निधी, आॅक्सिजन, सर्व यंत्रणा असताना मृत्यू का रोखू शकत नाही? असा सवाल आमदार किशोर पाटील यांनी उपस्थित केला व उपाययोजनांची मागणी केली़ अधिकाऱ्यांमधील मतभेदामुळे कोविड रुग्णालयच डॉ़ उल्हास पाटील रुग्णलयात हलवा असेही ते म्हणाले़ रुग्णांना आॅक्सिजन वेळेवर मिळत नाही, या बाबींवर लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली़या होणार चाचपण्या३० बेडचे आयसीयू शंभर बेडचे करणार, शाहू महाराज रुग्णालय कोविड रुग्णालय होऊ शकते का? कोरोना रुग्णालयाची क्षमता वाढविणाऱ मोहाडी येथील महिला रुग्णालयाचा वापर कोविडसाठी होऊ शकतो का? याबाबत चर्चा झाली़ डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयापर्यंत व्यवस्था म्हणून काही खासगी स्कूल बसेस लावता येतील का? 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव