ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 19 - जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे शौचालयांसाठी खोदकाम केलेल्या शोषखडय़ाचे लोखंडी अँगलच्या सहाय्याने मोजमाप करताना अँगलचा वीजतारांना स्पर्श होवून विजेच्या धक्क्याने किशोर हरी बाविस्कर (वय 30, रा़ गोरगावले बुद्रूक ता़ चोपडा) या मजुराचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी 9़30 वाजेच्या सुमारास घडली़ यात दुसरा मजूर संदीप विलास बाविस्कर (28) हा जखमी झाला असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़चोपडा तालुक्यातील गोरगावले बुद्रुक येथील किशोर बाविस्कर व संदीप विलास बाविस्कर या दोघा मित्रांनी जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे मुरलीधर वासुदेव सपकाळे यांच्याकडे रोजंदारीवर शौचालयांसाठी शोषखडय़ाच्या कामाचा ठेका घेतला होता़ या कामासाठी किशोर व संदीप हे दोघे पाच दिवसांपासून सपकाळे यांच्याकडे वास्तव्यास होत़े दोघांनी पाच दिवस वीस फुटाचा खड्डा खोदला़शुक्रवारी सकाळी शौचालयांसाठी आवश्यक त्याप्रमाणे शोषखड्डा खोदला आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी किशोरने खडय़ाचे मोजमाप करण्यासाठी लोखंडी रॉड घेतला व तो खड्डयात टाकून मोजमाप करणार त्याचवेळी वरील लोंबकळणा:या वीजतारांना रॉडचा स्पर्श झाल्याने किशोरला जोरदार विजेचा धक्का बसला़ यात त्याचा जागीच मृत्यू झाला़ तर खड्डयातील संदीप या जखमी झाला़ घरमालक मुरलीधर सपकाळे यांच्यासह ग्रामस्थांनी दोघांना रिक्षातून जिल्हा रूग्णालयात हलविल़े जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिका:यांनी किशोरला मृत घोषित केल़े याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े
शोषखडय़ाचे मोजमाप करताना वीजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू
By admin | Updated: May 19, 2017 15:50 IST