शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

प्रशासनाची डुलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:14 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : सेंट्रल फुले मार्केटमध्ये व्यावसायिक वापरासाठी दिलेल्या एका गाळ््याची विक्री केल्याच्या प्रकाराने प्रशासनाची डुलकी समोर आली ...

विजयकुमार सैतवालजळगाव : सेंट्रल फुले मार्केटमध्ये व्यावसायिक वापरासाठी दिलेल्या एका गाळ््याची विक्री केल्याच्या प्रकाराने प्रशासनाची डुलकी समोर आली आहे. या सर्व प्रकारात महापालिकेला अंधारात ठेवत शासनाचीही फसवणूक करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मध्ये नगर भूमापन विभागाने संबंधित व्यक्तीस ‘कारणा पुरता’ या अटीवर दिलेल्या संबंधित जागेच्या उताऱ्याच्या आधारे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयानेही कोणतीही शहानिशा न करता विक्रीची परवानगी देऊन टाकली. या बनवाबनवीमध्ये संबंधित विक्रेत्याचा मूळ गाळा वेगळा, परवानगी घेतली दुसºया गाळ््याची आणि विक्री केला तिसराच गाळा, असाही घोळ या सर्व प्रकारात झाला आहे. शहरातील सिटी सर्व्हे क्रमांक १९३८/३७ ब/१ ही शासन मालकिची सत्ता प्रकार ‘ब’ची वाणिज्य जागा असून असून ती मनपाच्या ताब्यात आहे. तिच्या मिळकत पत्रिकेवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या ३१ मे १९९४ रोजीच्या आदेशाप्रमाणे ‘वाणिज्य शेतीसारा’ बसविला आहे. नगर भूमापन विभागाकडून मिळकत पत्रिकेचा उतारा मिळणाºया या जागेवरील काही भाग शासनाने प्रत्येकी १५ व १६ चौरस मीटर जागा व्यावसायिकांना दिली. त्या जागेवर तत्कालीन नगरपालिकेने बेसमेंट, तळमजला, पहिला मजला असे तीन मजली गाळे स्वखर्चाने बांधून गाळा क्रमांक १ ते १६ ताबा पावतीने दिले. वाणिज्य वापरातील या गाळ््यांपैकी गाळा क्रमांक ५४वर वारसांच्या नावाची नोंद प्रतिज्ञापत्राद्वारे करून ‘कारणा पुरता’ मिळकत पत्रिकेचा उतारा घेण्यात आला. मिळालेल्या ‘कारणा पुरता’ उताºयाचा आधार घेत त्या सोबत अर्ज, खरेदी करून घेणारे व विक्री करणाºया मंडळींच्या प्रतिज्ञापत्रासह १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील नोंदणी न केलेली पाच लाख रुपयांची व ११ हजार रुपये बयाणा दिल्याच्या सौदा पावतीसह गाळा खरेदी-विक्रीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांकडे दाखल केला. त्याच दिवशी उपविभागीय अधिकाºयांनी जिल्हा निबंधकांना संबंधित जागेचा व्यवहार नियमित करण्यासाठी वार्षिक बाजारमूल्य मागण्याचे आदेश दिले. याच कार्यालयात या जागेचे टिपण तयार करण्यात येऊन त्यावरखरेदी करणाºयांनी जमीन आहे त्याच शर्तीवर घेण्यास तयार असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले. या सर्व प्रकाराचे प्रतिज्ञापत्र सादर करणे, सौदा पावती करणे हे सर्व होऊन नंतर अर्जदाराकडून मूल्यांकनाच्या ५० टक्के नजराणा २ लाख ९९ हजार २५० रुपये चलनाने शासनाकडे जमा करण्यात यावे असे टिपणही तयार करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकाºयांच्या पत्राने तहसीलदारांनी खरेदी विक्रीचे चलन तयार केले व अर्जदाराने ते शासन कोषागारात भरुन त्याची प्रत उपविभागीय कार्यालयात दाखल केली. नगर भूमापन विभागातून सुरू झालेल्या घोळामध्ये शासकीय नजराना जमा झाला तरी या प्रक्रियेदरम्यान हा बेकायदेशीर प्रकार आहे, हे कोणत्याच अधिकारी, कर्मचाºयाच्या लक्षात आला नाही की लक्षात आल्यानंतर हे व्यवहार करण्यात आले, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव