शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

फत्तेपूर येथील बाजारपेठेतील जलकुंभात आढळल्या मेलेल्या पाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:28 IST

फत्तेपूर येथील बाजार पेठेत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मेलेल्या चार ते पाच पाली आढळून आल्या असून यामुळे दूषीत बनलेले पाणी पिण्यात आल्यामुळे माजी उपसरपंचाची प्रकृती अस्वस्थ बनली.

ठळक मुद्देमाजी उपसरपंचाला हलविले जामनेर उपजिल्हा रुग्णालयातप्राथमिक आरोग्य केंद्राने घेतले पाण्याचे नमुने

फत्तेपूर.ता. जामनेर : येथील बाजार पेठेत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मेलेल्या चार ते पाच पाली आढळून आल्या असून यामुळे दूषीत बनलेले पाणी पिण्यात आल्यामुळे माजी उपसरपंचाची प्रकृती अस्वस्थ बनली. त्यांच्यावर येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जामनेर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.फत्तेपूर येथे बाजार पेठेत पाण्याची टाकी बांधलेली असून त्या टाकीमधील पाणी परिसरातील शेकडो लोक दररोज पीत असतात. ८ रोजी दुपारी येथील माजी सरपंच ईश्वरसिंग उमरावसिंग पाटील यांनी त्याच टाकीतील पाणी प्याले असता त्यांना अचानक मळमळायला लागून त्यांनाउलट्या सुरू झाल्या. त्यांना लगेचच प्रा.आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आणि याठिकाणी प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी १०८ या रूग्णवाहिकेने जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले.दरम्यान, सदर पाण्याची टाकी उघडून पाहिली असता टाकीच्या तळाशी ३ ते ४ मेलेल्या पाली दिसल्या व दोन- तीन पाली मेलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असतांना दिसल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राने या गंभीर बाबींची दखल घेत टाकीतील पाण्याची तपासणी करून नमुना घेतला. या प्रकारामुळे या परिसरातील जनता भयभीत झालेली आहे. तर पाणी पुरवठा करणा-या कर्मचा-यांच्या कार्यक्षमतेचे वाभाडे जनतेसमोर उघडे पडलेले असून त्यांच्या कामाविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Waterपाणी