शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीत नेलेला मृतदेह रुग्णालयात थेट आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 23:19 IST

संशयास्पद मृत्यू; गळ्यावर व्रण दिसल्याने रोखले अंत्यसंस्कार

जळगाव: टीबीचा आजार असलेल्या  योगेश वसंत अत्तरदे (40, रा. एमडीस काॅलनी मेहरून) या तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाला. रात्री आठ वाजता मेहरुण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु असतानाच त्याच्या गळ्यावर व्रण दिसून आल्याने संशय व्यक्त करुन पत्नी व इतर नातेवाईकांनी मृतदेह तेथून थेट जिल्हा रुग्णालयात आणला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,योगेश अत्तरदे या तरुणाला टीबीचा आजार होता. गेल्या 9 महिन्यापासून तो बेपत्ता होता.दहा दिवसांपूर्वीच तो घरी परतला. प्रकृती खराब असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने चार दिवसापूर्वी डॉक्टरांनी त्याला घरी सोडले होते. मंगळवारी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. आई, भाऊ यांनी त्याच्या मृत्यूची माहिती माहेरी गेलेल्या पत्नीला देऊन रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळविले. त्यानुसार नातेवाईक दाखल झाले. मृतदेह मेहरुंणच्या स्मशानभूमीत नेल्यावर पत्नीकडे काही लोकांनी चेहरा उघडून दाखवण्याची मागणी केली असता, त्यास भावाने विरोध दर्शविला, त्यामुळे इतरांना संशय बळावला पत्नीच्या आग्रहामुळे चेहरा उघडला असता योगेशच्या गळ्यावर फाशी दिल्याचे व्रण दिसून आले. नातेवाईकांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन घटनेची माहिती कळविण्यात आली रात्री उशिरापर्यंत झालेले नव्हते पोलीस चौकशी करीत होते. झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल योगेश त्याच्या पश्चात पत्नी सपना आई भाऊ व मुलगी असा परिवार आहे याबाबत पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नव्हती. दरम्यान योगेश याने गळफास घेतला असावा अशी शक्यता पोलीस व डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.