शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

झेडटीसी परिसराला जोडणाऱ्या बोगद्यात अंधार,  अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 15:47 IST

झेडटीसी परिसराला जोडणाऱ्या बोगद्यात अंधार आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

भुसावळ : झेडटीसी परिसराला जोडणारा बोगदा काही दिवसांपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. पूर्ण काम झालेले नसताना हा बोगदा खुला करण्यात आला. सध्या या बोगद्यात अंधार आहे. यामुळे येथे काळोख पसरला असून, अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बोगद्यात अंधार असल्यानेही अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे आहे. त्यामुळे या बोगद्यात रात्री अंधार राहात असून चोरी, लुटमार, विद्यार्थिनी व महिलांसोबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी तक्रार वाहनचालकांनी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्याकडे केली.रेल्वेने बांधलेल्या या बोगद्याचे अंतर २०० मीटरपेक्षा जास्त आहे. आतमध्ये अजूनही दिवे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे बोगद्यातील काळोखातून वाहने ये-जा करतात. अंधार असल्याने पुढची वाहने दिसत नाहीत. अचानक ब्रेक लावल्यास मागून आलेली वाहने धडकण्याची शक्यता असते. अंधारात वेग कमी जास्त करण्याससुद्धा वाहनचालकांना अडचणी येत आहेत. रेल्वे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन बोगद्यातील दिवे चालू करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख श्याम श्रीगोंदेकर, उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.तालुक्यातील भुसावळ, वरणगाव व इतर परिसरात ये जा करण्यासाठी हा मार्ग रेल्वे कर्मचारी, ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी, आर्मी जवान, विद्यार्थी, महिला व नागरिक वापरतात. काम अपूर्ण असतांना बोगदा खुला करायला नको होता, वाहनचालकांची सुरक्षितता लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने त्वरित दिवे लावावेत अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असे प्रा.धीरज पाटील यांनी कळविले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ