शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजाला दिशा देणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 17:35 IST

भुसावळ येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

ठळक मुद्दे१२५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपगरज ओळखून अंतर्नादने राबविले उपक्रम

भुसावळ, जि.जळगाव : सण, उत्सवात विद्यार्थी केंद्रीत उपक्रम राबवणाऱ्या सेवाव्रतींना समाजाने खंबीर पाठबळ द्यावे. गरज ओळखून सेवाप्रकल्प निर्व्याज भावनेतून हाती घेणाºयांचे प्रमाण वाढायला हवे. अंतर्नाद प्रतिष्ठान राबवत असलेला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजाला दिशा देणारा आहे, असे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे समन्वयक अरुण मांडाळकर यांनी सांगितले.अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवात ‘एक दुर्वा समर्पणाची’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी येथील स्वातंत्र्यसैनिक कृ.पा.पाटील प्राथमिक विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. वाचन ही जीवन समृद्ध करणारी कला आहे. ती विद्यार्थी दशेत आत्मसात करणे सुलभ होते. अंतर्नादने गरज ओळखून जो उपक्रम राबवला आहे, तो पथदर्शी आहे, असे मांडाळकर यांनी नमूद केले.प्रमुख पाहुणे म्हणून शहिद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश रायपुरे, नर्मदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परीक्षित बºहाटे, सचिव एस. डी.बºहाटे, सदस्य यशवंत भंगाळे, प्रा.डॉ.भाग्यश्री भंगाळे, सिद्धी विनायक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, सामाजिक कार्यकर्ते राजू महाजन, मनसेच्या महिला आघाडी शहराध्यक्षा रिना साळवी, शहराध्यक्ष विनोद पाठक, मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी यांची उपस्थिती होती. अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रकल्पप्रमुख प्रदीप सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ममता फालक यांनी, तर आभार समन्वयक अमितकुमार पाटील यांनी मानले.शिक्षिका मीनाक्षी चौधरी, सुनीता बºहाटे यांच्यासह ज्ञानेश्वर घुले, संजीव भटकर, प्रभाकर नेहेते, शैलेंद्र महाजन, महेश पाटील, सचिन पाटील, भूषण झोपे, संदीप सपकाळे, मंगेश भावे, नितीन देशमुख यांचे सहकार्य लाभले. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या १२५ विद्यार्थ्यांना वह्या, पेपर लिहिण्याचे पॅड, वह्यांचे कव्हर, पेन, पेन्सील, खोडरबर असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ