शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कळमडूच्या कन्येची ‘डेअरिंग’, हाती बसचे स्टेअरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:56 IST

असाही योग : पतीपाठोपाठ पत्नीनेही घेतला ‘लालपरी’च्या सारथ्याचा वसा, लवकरच होणार रुजू, सध्या सुरु आहे औरंगाबादला प्रशिक्षण

कैलास अहिरराव कळमडू, ता.चाळीसगाव : आजकाल महिलांसाठी भरारी घेण्यास अवघे आकाशच खुले झाले आहे. सर्वच क्षेत्रे महिला पादाक्रांत करीत आहेत. मात्र स्वत: डीएड पदवीधारक असताना शिक्षकी पेशा न स्वीकारता पती पाठोपाठ पत्नीनेही राज्य परिवहन महामंडळात चालक-वाहक पदाची नोकरी धरली. मूळच्या कळमडू (ता.चाळीसगाव) येथील कन्या असलेल्या शुभांगी कारभारी केदार (मोरे) यांना महिला एसटी बस वाहक-चालक होण्याचा मान मिळाला आहे. त्या जळगाव जिल्ह्यातील पहिल्या महिला बस चालक ठरल्या आहेत.ग्रामीण भागात धुराळा उडवत धावणारी एसटी बस अर्थात लालपरीची नाळ तेथील जनतेशी जुळलेली आहे, हे नव्याने सांगणेच नको. आता कळमडूसारख्या गावातून शुभांगी केदार यांना एसटीत मिळालेली संधी; तीदेखील पती-पत्नी यांना एकाच वेळी हा एक योगायोग व ही नाळ अधिकच घट्ट जुळणारी ठरणार आहे...महावितरणमध्ये नोकरीस असलेले येथील कारभारी शेनपडू केदार यांची शुभांगी ही कन्या. तिचा विवाह तालुक्यातील वडगाव-लांबे येथील सूरज अशोक मोरे यांच्याशी झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागासाठी वाहक-चालक अशी एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली. दोघेही पती-पत्नी यांनी या पदासाठी अर्ज केले. खरं तर शुभांगी डीएड पदविका व कला पदवीधारक आहे. ती शिक्षिका म्हणून खासगी शिक्षण संस्थेत नोकरी करू शकली असती. पतीसोबतच एसटीत नोकरीचा वसा तिनेही स्वीकारला.-वडिलांकडे अगोदरच चारचाकी वाहन असल्याने शुभांगीला तो लाभ एसटीतल्या या पदासाठी झाला. पती-पत्नी दोघेजण एकाचवेळी या पदासाठी पात्र ठरत त्यांची निवड झाली.- सध्या शुभांगीचे वाहक म्हणून प्रशिक्षण संपले आहे. चालक म्हणून औरंगाबाद येथे ती प्रशिक्षण घेत आहे. लवकरच ती पती सूरज मोरे यांच्या जोडीने जळगाव विभाग नियंत्रकात वाहक-चालक म्हणून एसटी बसची स्टेअरिंग हाती घेत रस्त्यावरुन धावू लागेल. तेव्हा तिच्यातील धाडसाला आपसूकच सलाम ठोकला जाईल. तिचा नुकताच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्या हस्ते सन्मानदेखील झाला. पती अन् पत्नी असे दोघेही लालपरीचे धुरकरी झाल्याचे हे अपवादात्मक उदाहरण ठरावे. 

टॅग्स :Bus DriverबसचालकJalgaonजळगाव