शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

नशिराबादला डेंग्यूने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 12:11 IST

खळबळ : साथीच्या आजाराचा फैलाव

ठळक मुद्देमन्यार मोहल्ला परिसरात अस्वच्छताडासांचा प्रादुर्भाव वाढलाग्रामस्थ धास्तावले

ऑनलाईन लोकमत

नशिराबाद, जि.जळगाव, दि. 13 - अस्वच्छतेचा गराडा, अनियमित 5 ते 6 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा व वातावरणातील बदलामुळे येथे सर्दी, खोकलासह तापाने रुग्ण फणफणले आहे. त्यात मन्यार मोहल्यातील (काटय़ाफाईल परिसर) सईदाबी शेख इसाक (वय 42) या महिलेचा रविवारी डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. नशिराबादसह परिसरात डेंग्यूसह साथीचे आजाराने डोके वर काढले आहे. अजून 3 ते 4 रुग्णांना डेंग्यूसदृश आजाराची लागण असल्याचे सांगण्यात आले. साथीच्या आजारावर ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राने अद्यापर्पयत कुठलीही ठोस उपाययोजना केली नसल्याने त्याबाबत ग्रामस्थ नाराजी व संताप व्यक्त करत आहे.मन्यार मोहल्यातील सईदाबी शे. इसाक हे गेल्या आठवडय़ापूर्वी तापाने फणफणले होते. त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले; मात्र अद्याप ताप कमी होत नसल्याने जळगावी खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रक्ताच्या नमुन्यांची चाचणी केली त्यात डेंग्यू पॉङिाटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाल्याचे त्यांच्या परिवाराने सांगितले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गावात सर्दी, खोकला तापाने रुग्ण फणफणले आहे.  दरम्यान वरची आळीतील  दीड वर्षीय बालकास डेंग्यूची लागण झाली आहे. त्याच्यावर जळगावी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.गावात डेंग्यूने शिरकाव केल्याने नागरिक धास्तावले आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींनी याबाबत दखल घ्यावी.    मन्यार मोहल्ला परिसरात अस्वच्छता आहे. गटारींची स्वच्छता नियमित होत नसल्याची ओरड परिसरातील रहिवाश्यांची आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीचे आजार पसरत आहे. याबाबत ओरड होऊनही ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राने दखल घेत नसल्याचा संताप व्यक्त होत आहे. गटारींवर जंतूनाशक फवारणी व गावात फॉगिंग मशिनद्वारे धूरळणी करावी, अशी मागणी होत आहे. गावात डेंग्यूसह साथीच्या आजाराबाबत जनजागृती करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.ू