शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मेहरूण तलावाची जैवविविधता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:30 IST

१२ व्या शतकापासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मेहरूण तलावातील जैवविविधतादेखील मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आली आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्हा आणि गाव ...

१२ व्या शतकापासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मेहरूण तलावातील जैवविविधतादेखील मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आली आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्हा आणि गाव पातळीवर जैवविविधता समित्या स्थापन करून त्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. मात्र, यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे तलाव परिसरातील जैवविविधता धोक्यात आली आहे. विविध वनस्पती, जलचर प्राणी, मासे, देशी- परदेशी पक्षी, वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी यांचे अस्तित्व असलेल्या मेहरूण परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. लांडोरखोरी राखीव वनक्षेत्र लागून असल्याने वन्यप्राण्यांचेदेखील या भागात वास्तव्य असते. मात्र, मानवी अतिक्रमण, प्रदूषण, सांडपाणी, रहिवासासाठी उभारलेले सिमेंटचे जंगल यामुळे या परिसरातील नैर्सगिक सौद्यर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ शहरातील दोनशेवर विहिरींना जीवदान देणाऱ्या मेहरूण तलावातील नितळ पाणी इतिहास जमा झालेले आहे. जळगावच्या वैभवात भर घालणाºया या तलावात ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे. गटारीच्या पाण्यामुळे अनेक वनस्पती नष्ट होत असून, ५० टक्के पक्ष्यांनी या तलावाकडे पाठ फिरवली आहे. नैसर्गिक जलस्रोतही बदलल्याने या तलावाची वाटचाल गटाराच्या दिशेने सुरू झाली आहे. म्हणून सर्व पर्यावरण प्रेमी व जागरूक नागरिकांनी शहराच्या सौंदर्यात भर घालणाºया मेहरुण तलावाचे संरक्षण व जलसंवर्धन करणे तसेच मनपाने त्याची योग्य निगा व काळजी घेणे खूप गरजेचे आहे.- अशफाक पिंजारी, जिल्हाध्यक्ष आॅल इंडिया मुस्लीम ओबीसी आॅर्गनायझेशन

टॅग्स :Jalgaonजळगाव