शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला विनाकारण भटकणाऱ्यांना ‘दंडाची बेडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST

चाळीसगाव : लॉकडाऊन असतानाही निर्बंध झुगारून विनाकारक बाहेर भटकणाऱ्यांना पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने रडारवर घेतले आहे. सकाळी ११ ...

चाळीसगाव : लॉकडाऊन असतानाही निर्बंध झुगारून विनाकारक बाहेर भटकणाऱ्यांना पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने रडारवर घेतले आहे. सकाळी ११ नंतर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. शनिवारी अशा ५४ जणांकडून ५० हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाच्या संक्रमणाचा विळखा तोडण्यासाठी लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आले. यासाठी पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. बाहेर भटकणारे, मास्क न लावणाऱ्यांना गाठण्यासाठी चार पथके केली गेली आहेत. पालिकेचे पथकही सक्रिय झाले असून संयुक्तपणे धडक कारवाई करण्यात येत आहे.

.....

चौकट

एकाच दिवशी ५० हजार दंडवसुली

शनिवारी एकाच दिवशी शहराच्या विविध भागांत विनाकारण बाहेर फिरणारे, मास्क न लावणाऱ्यांकडून पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस उपनिरीक्षक विशाल टकले, सचिन कापडणीस, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, एपीआय निसार सय्यद यांच्यासह पालिकेच्या पथकातील दिनेश जाधव, प्रवीण तोमर, जितेंद्र जाधव, प्रशांत सोनावणे, रवींद्र जाधव, प्रसाद बाविस्कर यांनी ही कारवाई केली. ५४ जणांकडून दंड वसूल झाल्याने बाहेर फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

१... विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून धडक कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना काळात सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

शुक्रवारीही २८ हजारांचा दंड

मास्क न लावलेल्या, विनाकारण फिरणाऱ्यांकडून शुक्रवारीदेखील पथकाने २८ हजार ८५० रुपये इतका दंड वसूल केला. एकूण ६७ जणांवर कारवाई केली गेली.

===Photopath===

240521\24jal_2_24052021_12.jpg

===Caption===

चाळीसगावला विनाकारण भटकणाऱ्यांना ‘दंडाची बेडी’