शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नाचण्यावरून लग्न मोडले आणि समजूतदार वधूने जोडले...

By admin | Updated: May 20, 2014 01:21 IST

पारोळा : हळद रुसून पुन्हा हसल्याने वादावर पडला पडदा...

पारोळा : लग्न म्हणजे दोन जीवांबरोबरच दोन कुटुंबांचे मनोमिलन. लग्नामुळे दोन्ही घरी आनंदोत्सवच असतो. मात्र या आनंदावर पाणी फिरविण्याचे काम ‘दारू’ने केले. लग्नाच्या आदल्या दिवशी दारू पिऊन नाचण्यावरून दोन्ही परिवारात वाद होऊन सात जन्माच्या गाठी मंडपातच सुटल्या... अपमान झाला म्हणून लग्न मोडले... वाद पोलीस स्टेशनपर्यंत गेला..अखेर मुलीनेच पुढाकार घेत मुलाची समजूत काढली. त्याचेही मन हेलावले अन् तो लग्नाला तयार झाला. हळद रुसली अन् पुन्हा हसल्याचा प्रत्यय पारोळेकरांना आला. संगमनेर येथील रहिवासी व पुणे येथे अभियंता असलेल्या मुलाचा मध्य प्रदेशातील राजपूर येथील उच्चशिक्षित मुलीशी विवाह जुळला. दोन्ही परिवारांना सोयीचे ठरावे म्हणून लग्न पारोळ्यातील नातेवाइकांकडे करण्याचा निर्णय झाला. विवाह सोहळा १९ मे रोजी होता. दोन्हीकडील वºहाडी मंडळी दोन दिवसांपूर्वीच शहरातील बालाजी शाळेत दाखल झाली. १८ रोजी वधू-वरांना हळद लागली. मुलाकडील काही तरुण मद्य प्राशन करून डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होते. नाचताना त्यांचा मुलीकडील महिलांना, लहान मुलांना धक्का लागत होता. काहींनी त्यांना बाजूला नाचा, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. इथेच वादाची ठिणगी पडली. मुलाकडील तरुणांचा धिंगाणा सहन न झाल्याने मुलीकडील एकाने एका तरुणाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर हाणामारी सुरू झाली. दोघांकडे पळापळ झाली. कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. नवरदेवाने हळदीच्या कपड्यावरच आपले सर्व साहित्य गुंडाळत, आमचा अपमान झाला, मला लग्न करायचे नाही असे सांगितले. त्यामुळे मुलीकडील मंडळीचे होश उडाले. वºहाडी मंडळी विवाहस्थळावरून थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहचली. मुलीचे लग्न मोडत असल्याने तिच्या आई-वडिलांनी आक्रोश केला. त्यांनी जावयाची माफी मागितली. मात्र त्याला पाझर फुटला नाही. अखेर नवरदेवापाठोपाठ नवरीकडील मंडळीही पारोळा पोलीस स्टेशनमध्ये पोहचली. नवरदेव-नवरी समोरासमोर आल्यावर त्यांच्यातही शाब्दिक चकमक झाली. तुम्ही उच्चशिक्षित असून, तुमचे असे विचार असतील तर मलाही तुमच्याशी लग्न करायचे नाही, असे सर्वांसमक्ष मुलीने सुनावले. पोलिसांनीही ‘खाकी’ बाजूला ठेवत माणुसकीच्या नात्याने दोघा परिवारांची समजूत काढली. दोन्ही मंडळींनी पारोळा येथील अ‍ॅड. उज्ज्वल मिसर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनीही दोघांची समजूत काढली; मात्र उपयोग झाला नाही. (वार्ताहर)