शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या वादामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 12:21 IST

अजय पाटीलमनपाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अजूनही अनेक कर्मचाºयांचे काही महिन्यांचे वेतन झालेले नाही. अशी परिस्थिती असताना केवळ शासनाकडून येणाºया निधीतूनच शहराचा विकास करावा लागत आहे.मनपाच्या काही अधिकाºयांच्या अंतर्गत वादामुळे शहर विकासाच्या अनेक महत्त्वाच्या फाईल दोन-दोन महिने मनपा प्रशासनाकडे पडून आहेत. आलेल्या निधीतून कामे मार्गी लागत नसल्याचा प्रकार मनपात सध्या ...

अजय पाटीलमनपाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अजूनही अनेक कर्मचाºयांचे काही महिन्यांचे वेतन झालेले नाही. अशी परिस्थिती असताना केवळ शासनाकडून येणाºया निधीतूनच शहराचा विकास करावा लागत आहे.मनपाच्या काही अधिकाºयांच्या अंतर्गत वादामुळे शहर विकासाच्या अनेक महत्त्वाच्या फाईल दोन-दोन महिने मनपा प्रशासनाकडे पडून आहेत. आलेल्या निधीतून कामे मार्गी लागत नसल्याचा प्रकार मनपात सध्या दिसून येत आहे. मंगळवारी मनपा उपायुक्त चंद्रकांत खोसे व आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्यात झालेल्या वादामुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे. या वादामुळे अनेक महिन्यांपासून मनपामध्ये राजपत्रित अधिकारी व विरुद्ध मनपा अधिकारी असे दोन गट तयार झाल्याचेही दिसून येत आहे. काही शहरांमध्ये राजकीय पदाधिकाºयांमध्ये अनेकदा वाद असताना प्रशासनाचे अधिकारी मात्र या वादावर तोडगा काढत शहर विकासाचा गाडा हाकत असतात. मात्र, जळगाव महापालिकेत चित्र वेगळे दिसून येत आहे. या ठिकाणी प्रशासनातील अधिकाºयांमध्येच अंतर्गत राजकारण सुरू आहे. त्यामुळे शहराच्या विकासासंबंधी व काही समस्यांसंबंधीचे निर्णय होऊ शकणाºया फाईलींकडे दुर्लक्ष होत आहे. अधिकाºयांचा या वादामुळे शहरातील नागरिकांना का वेठीस धरले जात आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आधीच शहरातील नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नाही. त्यामुळे शासनाकडून येणाºया योजना व निधीच्या बाबतीत ‘खोडा’ घालण्याचा अधिकार मनपातील अधिकाºयांना कोणी दिला? उपायुक्त चंद्रकांत खोसे यांचे राजेश कानडे यांच्याशी मतभेद असू शकतात. तसेच दैनंदिन कामकाज करत असताना विभाग प्रमुखांसोबत काही मतभेद किंवा वाद असू शकतात. मात्र, त्यांच्या या वादामुळे ६ लाख जळगावकरांना सोयी सुविधांपासून वंचित ठेवू नये. स्वच्छता वॉर्ड स्पर्धेचे असो वा घनकचरा प्रकल्पाच्या ९ कोटी रुपयांच्या निधीबाबतच्या फाईल्स दोन महिने उपायुक्तांकडे पडून राहिल्याने स्वच्छ शहर सर्वेक्षणातदेखील जळगाव शहराला फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व प्रकाराबाबत मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी चुप्पी साधली आहे. या वादावर त्यांनी तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा मनपा राजपत्रित अधिकारी व मनपा अधिकाºयांचा या राजकारणामुळे जळगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांनाच अधिक फटका बसत राहील.

टॅग्स :Jalgaonजळगाव