शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सहा तालुक्यात साडेचार हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 23:08 IST

अवकाळीचा तडाखा :  सर्वाधिक नुकसान जळगाव तालुक्यात  जळगाव : शनिवार, २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ...

अवकाळीचा तडाखा :  सर्वाधिक नुकसान जळगाव तालुक्यात 

जळगाव : शनिवार, २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील चार हजार ५३४.३० हेक्‍टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक एक हजार ९०६ हेक्‍टरवर जळगाव तालुक्यात नुकसान झाले आहे. पिकांमध्ये मक्‍याला सर्वाधिक फटका बसला असून १३९१.२० हेक्‍टरवरील मका हातचा गेला आहे.गेल्या महिन्यात १८ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी मधून  बळीराजा सावरत नाही तोच पुन्हा २० मार्च रोजी संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामध्ये जिल्ह्यातील जळगाव, बोदवड, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या सहा तालुक्यात  पिकांना मोठा फटका बसला आहे. याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.

जळगाव, चाळीसगाव तालुक्यात अधिक नुकसानशनिवारी झालेल्या अवकाळी पावसामध्ये सर्वाधिक नुकसान जळगाव तालुक्यातील  झाले असून एक हजार ९०६ हेक्‍टर वरील पिके नष्ट झाली आहे. त्याखालोखाल चाळीसगाव तालुक्यात १५९२.९० हेक्‍टर वर नुकसान झाले. तसेच पाचोरा तालुक्यात ८६२.२० हेक्‍टर, बोदवड तालुक्यात ८९.४० हेक्‍टर, मुक्ताईनगर तालुक्यात ४६ हेक्‍टर, भडगाव तालुक्यात ३७.८०  हेक्टरवर असे एकूण चार हजार ५३४.३० हेक्‍टरवर नुकसान झाले आहे.

सर्वाधिक फटका मक्यालापिकांमध्ये सर्वाधिक फटका मक्‍याला बसला असून सहा तालुक्यात १३९१.२०हेक्‍टरवरील मका नष्ट झाला आहे. त्याखालोखाल रब्बी ज्वारीचे १०५४.५० हेक्‍टरवर नुकसान झाले आहे. ६११.२० हेक्‍टर वरील गहू, ५१८.३० हेक्‍टर वरील फळपिके, २५५.४०  हेक्‍टरवरील भाजीपाला, २३५ हेक्‍टर वरील केळी, २०९ हेक्‍टरवरील बाजरी, २०२.३० हेक्‍टरवरील हरभरा , ५०.९० हेक्‍टरवरील कांदा, ४.१० हेक्‍टरवरील तीळ, २.४० हेक्‍टरवरील मूग असा विविध पिकांना फटका बसला आहे.

११२ गावातील सहा हजार ६८९ शेतकरी बाधितसहा तालुक्यांमधील ११२ गावातील एकूण सहा हजार ६८९ शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान ३३ टक्क्यांच्या वर असून तसा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव