शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

जळगावात डेंग्यूच्या रुग्ण संख्येत दिवसागणिक वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:12 IST

खाजगी रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी : डेंग्यू सदृश आजाराची मनपाकडील आकडेवारी पोहचली 330वर

ठळक मुद्देघरातील एक बरा झाला की दुस:याला त्रासमनपाकडून सव्रेक्षण, फवारणीचिकुन गुनियानी नागरिकांचे हातपाय जखडले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17 -  शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दररोज वाढतच असून खाजगी रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. विशेष म्हणजे मनपाच्या आरोग्य विभागाकडे डेंग्यू सदृश अशी नोंद असली तरी खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांचे अहवाल पॉङिाटिव्ह येत असल्याचे चित्र आहे. मनपाकडेदेखील सदृश म्हणून नोंद असलेल्या रुग्णांची संख्या 330वर पोहचली आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूचा पॉङिाटिव्ह अहवाल नसला तरी नागरिक धास्तावले आहेत तर दुसरीकडे चिकून गुनियाने शहरवासीयांचे शरीर जखडले जात आहे.  शहरात गेल्या दीड महिन्यापासून डेंग्यू व इतर आजारांनी  मोठय़ा प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यातच  पावसामुळे घराशेजारी तसेच इतरत्र साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत आहे. शहरातील महाबळ कॉलनी परिसर, संभाजीनगर, मेहरूण, रामानंदनगर, आदर्शनगर, आयोध्यानगर, वाघनगर, एकनाथनगर यासह विविध भागात यापूर्वी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.रामेश्वर कॉलनी परिसरातील एकनाथनगर या भागातही डेंग्यूचे रुग्ण असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. या भागातील काही मुलांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना डेंग्यू असल्याचा अहवाल आला. येथील प्रचंड अस्वच्छतेबाबत नागरिकांनी मनपाकडे तक्रार केली, मात्र इकडे कोणीही फिरकले नाही की साफसफाई केली नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या सोबतच वाघनगर, आयोध्यानगर भागातही अशीच स्थिती असून वाघनगर, यशवंतनगर, अयोध्यानगर, शिवकॉलनी, गणपतीनगर परिसरातील गुरूनानकनगर, महाबळ परिसरातील हनुमान कॉलनी या भागात डेंग्यूची लागण झाली असून नागरिकांचे  खाजगी रुग्णालयातील अहवालही पॉङिाटिव्ह आले आहेत.  विशेष म्हणजे अनेक ठिकाणी घरातील एक जण बरा झाली की, दुस:याला त्यांची लागण होत आहे. मनपाकडे 330 रुग्णांची नोंदमनपाच्या आरोग्य विभागाकडे शहरातील विविध भागात 330 डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण असल्याची नोंद आहे. दिवसेंदिवस डेंग्यू सदृश आजाराच्या रुग्णांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 रोजी 314 असणा:या या संख्येत दोनच दिवसात 16 रुग्णांची भर पडून ही संख्या 330वर पोहचली आहे.  डेंग्यू सोबतच शहरवासीय स्वाइन फ्लूच्या भीतीने धास्तावले असून दोनच दिवसांपूर्वी  स्वाइन फ्लू सदृश आजाराने एका महिलेचा मृत्यू झाल्याने त्यात भर पडली आहे. चिकुन गुनियादेखील डोके वर काढत असल्याने नागरिक जखडून गेले आहेत. डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर मनपाच्यावतीने शहरात सव्रेक्षण करण्यात येत असून सोबतच अबेटींग करण्यासह फवारणी, धुरळणी केली जात असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.  25 कर्मचारी तैनातमनपाचे 25 कर्मचारी शहरात फवारणी, धुरळणी, अबेटिंग करण्यासह डॉक्टरांसोबत काम करीत आहे. 25पैकी 10 कर्मचारी मनपाच्या डॉक्टरांसोबत उपचारासाठी मदत करीत आहे. उपचार नाही, काळजीच पर्यायडेंग्यूसाठी उपचार नाहीत, मात्र लक्षणानुसार उपचार करता येतात. त्यामुळे प्रतिबंध हाच चांगला उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच नागरिकांनी स्वत:देखील काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. घरातील अथवा परिसरातील साचलेले पाणी नष्ट करा, कोरडा दिवस पाळा अशा विविध उपाययोजना कराव्यात, असे आवाहन  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.     

शहरात डेंग्यू सदृश आजाराचे 330 रुग्ण असून उपाययोजना केल्या जात आहे. संबंधित रुग्णांवर उपचार करण्यात येऊन या बाबतची माहिती वरिष्ठांकडे पाठविली जाते.- डॉ. राम रावलाणी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा.

डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर शहरात फवारणी, धुरळणी तसेच अॅबेटिंग केले जात आहे. यासाठी 25 कर्मचारी आहेत. - एस.व्ही. पांडे, जीवशास्त्रतज्ज्ञ, मनपा.