शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दालमिलचा मराठवाड्याशी व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:15 IST

दररोज जाणारा २०० टन माल थांबला

जळगाव : जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेचा फटका वाहनधारकांसह उद्योग क्षेत्रांना बसू लागला असून जळगावातील दालमिलमधून मराठवाड्यात दररोज जाणाऱ्या २०० टन डाळचीही वाहतूक गेल्या सहा महिन्यांपासून थांबली आहे. सोबतच लातूरसह वेगवेगळ््या भागातून येणारा कच्चामालही येत नसल्याने दालमिलला दुहेरी फटका बसत आहे.जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी या रस्त्याचे काम जवळपास दीड वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. त्यात जामनेर तालुक्यातील नेरीपासून या कामाला सुरुवात होऊन हळूहळू थेट औरंगाबादपर्यंत संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूने खोदून ठेवण्यात आला. रस्ता तर खोदला गेला मात्र काँक्रीटीकरण, डांबरीकरणाच्या कामाने गती काही घेतली नाही. त्यामुळे गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून वाहनधारकांसह व्यापारी, उद्योजकांना या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.दालमिलची ग्राहकी तुटलीजळगावातील दालमिलमधून विदेशात डाळ निर्यात होण्यासह देशातही विविध भागात जाते. त्यात शेजारीच असलेल्या मराठवाड्यात दालमिलचा माल मोठ्या प्रमाणात जातो. मात्र जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेमुळे अवजड वाहतूक करणे जिकरीची ठरत आहे. परिणामी या मार्गावरून डाळ, धान्याची वाहतूक करणे सध्या वाहनधारक टाळत आहे. जळगाव येथून पहूरसह सिल्लोड, औरंगाबाद, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणात डाळ जाते. सोबतच मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यात तिला मागणी आहे. त्यामुळे जळगावातून दररोज १५ ते २० ट्रकद्वारे त्या भागात डाळची वाहतूक केली जात असे. मात्र रस्त्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली व जवळपास २०० टन डाळीची वाहतूक थांबली आहे.कच्चा मालही येईनाजळगावात ५० ते ५५ दालमिल असून येथे दररोज ७०० ते ८०० टन कच्चा माल लागतो. आधीच सरकारने एप्रिल महिन्यात कडधान्याच्या आयातीवर निर्बंध घातल्याने केवळ १५ टक्केच कच्चा माल विदेशातून आयात करता येत आहे. हे प्रमाण कमी होण्यासह आता औरंगाबाद, लातूर, सिल्लोड या भागातून येणारा हरभरा, तूरही येत नसल्याने त्याचा परिणाम होत आहे. लातूर येथील तूरला अधिक मागणी असल्याने तेथील कच्च्यामालापासून तयार तूर डाळ उत्पादनावरही अधिक भर असतो. मात्र सध्या या तुरीसह कच्चामालही येत नसल्याने दालमिलला दुहेरी फटका बसत आहे.जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दररोज मराठवाड्यात जाणारी २०० टन डाळीची वाहतूक थांबली आहे. सोबतच तेथून येणारा कच्चा मालही येत नसल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन

टॅग्स :Jalgaonजळगाव