शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ रेल्वेस्थानकावर रेल्वे कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:37 IST

रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक दोन-तीनवर असलेल्या फूड ट्रक आयआरसीटीसीच्या केएमए कॅटर्स रसोई घरमध्ये खाद्यपदार्थ बनवत असताना अचानक सिलेंडरचा भडका उडाल्याने स्थानकावर खळबळ उडाली.

मोठी दुर्घटना टळली : सुरक्षेचा विषय ऐरणीवरभुसावळ : २४ तास गजबजलेल्या रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक दोन-तीनवर असलेल्या फूड ट्रक आयआरसीटीसीच्या केएमए कॅटर्स रसोई घरमध्ये खाद्यपदार्थ बनवत असताना अचानक सिलेंडरचा भडका उडाल्याने स्थानकावर खळबळ उडाली. घटना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षिततता ऐरणीवर आली आहे.मध्य रेल्वेचा आत्मा असलेला भुसावळ विभाग व भुसावळ विभागाचा हृदय समजला जाणारा भुसावळ स्थानकावर १६ रोजी दुपारी एकच्या सुमारास आयआरसीटीसी फुड ट्रॅक केएमएफुट कॅटर्सच्या क्रमांक दोन व तीन मध्यभागी व प्रवाशांच्या अगदी दादऱ्यासमोर व लिफ्टच्या भिंतीला लागून असलेल्या रसोई घरात गरम करत असताना अचानक सिलेंडर ने भडका घेतला घटना समजताच स्थानकावर एकच खळबळ उडाली आगीमुळे घटनास्थळी संपूर्ण धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये आणखीनच घबराट पसरली होती ,कॅन्टीन मधील कर्मचारी यांनी एकूण ८ फायर एक्सटेंशनच्या सहाय्याने व गाडीत पाणी भरणाºया नळीच्या सहाय्याने आग त्वरित आटोक्यात आणली.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्टेशन निर्देशक जी. आर. अय्यर, स्टेशन आरपीएफ निरीक्षक दिनेश नायर, कॅन्टीन निरीक्षक शकील शेख, विभागाचे किरण ठाकूर, शैलेश पारे, विद्युत विभागाचे शेख अश्पाक, आदींनी त्वरित घटनास्थळ गाठून जागेची पाहणी केली. वस्तुस्थिती समजून घेतली.दरम्यान, २४ तास १३० प्रवासी गाड्या ये-जा करणाºया प्रवाशांनी सतत वर्दळ असलेल्या रेल्वेस्थानकावर सिलेंडरचा भडका उडाल्याने सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती शहरांमध्ये वाºयासारखी पसरताच स्थानकावर गावी जाण्यासाठी आलेल्या प्रवासांच्या आप्तेष्टांनी लगेच स्थानकावरील प्रवाशांची झालेल्या घटनेबद्दल माहिती जाणून घेतली व शहानिशा केली व मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांचा व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.घटनेचे गांभीर्य पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणीरेल्वेस्थानकावर सिलेंडरचा भडका झाल्याची माहिती समजतात अप्पर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के.शर्मा, वाणिज्य व्यवस्थापक अरुणकुमार, सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच ज्या ठिकाणी भडका उडाला उडाल्याने लाकडी आकोडा असलेले लाकडी साहित्य जळाले तसेच विद्युत बोर्ड वायरिंग व बोर्ड यांना पण आगीचा भडका लागला होता. रसोई घराला सील करण्यात आले.घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य बघून सखोल चौकशी केली जाईल. चौकशीअंती जो कोणी दोषी असेल त्याच्यावर सक्तीची कारवाई करण्यात येईल.-आर.के.शर्मा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, भुसावळ

टॅग्स :fireआगBhusawalभुसावळ